Ex-minister-attacks-on-MLA-Siddharth-Kharat : माजी आमदाराचा विद्यमान आमदाराला सवाल, पत्रकार परिषदेतून हल्ला
Mehkar मेहकर लोणार तालुक्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ५ हजार २०० कोटींची विकास कामे मंजूर करून आणली. आमच्यावर टीका करणाऱ्या आमदार सिद्धार्थ खरात यांनी गेल्या सव्वा वर्षात एखादे तरी ठोस काम मंजूर करून आणले का ते त्यांनी दाखवावे, असे थेट आव्हान माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिले.
मेहकर येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संजय रायमुलकर बोलत होते. मेहकर शहरात आम्ही ९३२ कोटींची कामे मंजूर करून आणली. यातील बहुतांश कामे पूर्ण होत आलीआहेत, असे सांगून रायमुलकर म्हणाले की, सिमेंट रस्ते ,डांबरी रस्ते, सभामंडप ,स्मशानभूमीची कामे याबरोबरच आरोग्य, शिक्षण, सिंचन रस्ते, बांधकाम अशी मतदार संघात ५२०० कोटींची कामे मंजूर करून आणली .त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. आम्ही मंजूर केलेल्या कामांना भेटी देऊन ती कामे जणू आपणच करत आहोत असा आभास आमदार खरात व त्यांचे चेले चपाटे करत आहेत. आयत्या पिठावर रेघोट्याओढण्याचे काम त्यांनी बंद करावे.
मेहकर शहरात दहा कोटींची प्रशासकीय इमारत, सहा कोटी रुपयांची विद्यार्थी अभ्यासिका, पावणेचार कोटी रुपयांची पोलीस स्टेशनची इमारत, दहा कोटी रुपयांचा डीपी रोड ,सव्वातीन कोटी रुपयांचे वारकरी भवन, बालाजी मंदिरातील आठ कोटींची कामे, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक संकुल चे सहा कोटीचे काम आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराज उद्यानातील साडेआठ कोटींची विकास कामे केवळ आणि केवळ आम्हीच मंजूर करून आणली असून यातील बहुतांश कामे पूर्ण झाले आहेत, काही प्रगतीत आहेत. याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार खरात ,नगराध्यक्ष यांनी घेऊ नये. आम्ही एक कोटी दहा लाख रुपयांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक पुतळा शिवाजी उद्यानात बसविणार आहोत, असेही रायमुलकर म्हणाले.
कामांची पाहणी करण्याच्या निमित्ताने जणू ही कामे आम्हीच मंजूर करून आणली आहेत असा जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार खरात आणि त्यांचे इतर चले चपाटे करत आहेत. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप रायमुलकर यांनी केला. ग्रामीण भागातले सर्व रस्ते आम्ही दर्जेदार बनविले आहेत. सर्व गावांमध्ये विविध विकास कामे केली आहेत. तरीही मतदारसंघ भकास करून ठेवल्याचा आरोप विरोधक करत आहेत .हे चुकीचे आहे, असेही संजय रायमुलकर म्हणाले.
TET teachers : टीईटी अपात्र शिक्षकांच्या पदोन्नतीला पूर्णविराम
मुंबई आणि नांदेड येथील मागासवर्गीय बांधवांच्या कार्यक्रमातील भाषणात आमदार खरात यांनी सांगितले की, इतर समाजांना सोबत घेतल्याशिवाय आपण राजकारणात पुढे जाऊ शकत नाही, यासाठी मी अनेक फंडे वापरले . त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका . म्हणजे गळ्यात विणा अडकवून हिंदू धर्मातील बांधवांची त्यांनी दिशाभूल केली आहे हे स्पष्ट आहे. जनतेने हे लक्षात घ्यावे. आमच्याकडे त्यासंबंधीचे सर्व व्हिडिओ आहेत, असेही रायमुलकर म्हणाले.
बोलबच्चन आणि नटवरलाल असा हा लोकप्रतिनिधी आहे. त्यापासून जनतेने सावध राहावे. राज्यात महायुतीची सत्ता आहे .त्यामुळे आम्ही आणि आम्हीच फक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सहकार्याने विकास कामे आणू शकतो ,असेही संजय रायमुलकर यांनी सांगितले. स्वतः विकास कामे मंजूर करून आणा आम्ही त्याचे स्वागत करू परंतु आम्ही मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे श्रेय उपटू नका, असेही ते म्हणाले.
मेहकर शहरासाठी ११२ कोटींच्या पेनटाकळी प्रकल्पावरून च्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाला जाते आहे. ते पूर्ण झाल्यावर शहराला रोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. लोणार शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने सुरू आहे, असेही संजय रामुलकर यांनी सांगितले. आमच्या नादी लागू नका, आम्ही मूळ शिवसेना आहोत , असा इशाराही त्यांनी दिला.
Air ambulance crash : दिल्लीकडे जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात
मेहकर नगरपालिकेत नगराध्यक्ष विरोधी पक्षाचा असला तरी काँग्रेस आणि शिवसेनेचे मिळून २० नगरसेवक आहेत. त्यांचेकडे फक्त सहा आहेत. त्यामुळे बहुमतानेच इथे निर्णय होतील ही काळया दगडावरची रेघ आहे, असेही रायमुलकर म्हणाले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व बांधकाम सभापती सुरेशतात्या वाळूकर, शहर प्रमुख जयचंद बाठिया , प्रा. विनोद पह्राड, अमोल कंकाळ, गवई , बाजार समितीचे उपाध्यक्ष विलास मोहरुत, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे त्यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.








