Sanjay Sawkare : पालकमंत्रीपद सोडण्यासाठी संजय सावकारेंवर दबाव !

MLA Bhondekars sensational allegation; Bhoyar also reacted : आमदार भोंडेकरांचा खळबळजनक आरोप; भोयरांची पण प्रतिक्रिया

Bhandara : भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदा बाबत झालेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पालकमंत्रिपद काढून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी धक्कादायक आरोप करत म्हटले की, “भंडाऱ्याचे पालकमंत्री पद सोडण्यासाठी सावकारेंवर दबाव होता. मागील दहा-पंधरा दिवसांपासून मी ऐकत होतो की स्वतः सावकारे हे पद सोडण्यास इच्छुक होते. त्यांना काहीसा त्रास होत असल्यामुळे त्यांनी दोन-तीन वेळा भंडारा नको, मला जवळचा जिल्हा द्या, अशी मागणी केली होती. कदाचित त्यांच्या आग्रहामुळेच हा बदल झाला असावा.”

भोंडेकर म्हणाले की, “बाहेरचे लोक आमच्या जिल्ह्यात किती वेळ देऊ शकणार? मागच्या निधीत आम्हाला पाहिजे तसा निधी मिळाला. मात्र यंदा दबाव असल्याने निधी कमी मिळाला. बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आल्यावर तो वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आमची मागणी हीच आहे की पालकमंत्री स्थानिकच असावा. स्थानिक आमदारांना काम देऊ नका, असे सांगितले जात असेल तर ते चुकीचे आहे.”

Aapala Sarkar : ‘आपले सरकार’ पोर्टल आता अधिक सुलभ होणार !

 

संजय सावकारे यांच्या कारकिर्दीवरही त्यांनी टीका केली. “पालकमंत्री असूनही ते पूर्ण वेळ जिल्ह्यात उपलब्ध नसत. झेंडा टू झेंडा म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ते येत असत. पूरपरिस्थितीतही ते जिल्ह्यात आले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. जिल्हा विकासाच्या बाबतीत ते ठोस निर्णय घेऊ शकले नाहीत. जळगावहून येणारे असल्याने त्यांना भंडाऱ्याला वेळ देता आला नाही आणि त्यामुळेच शिंदे गटाच्या आमदार म्हणून माझी ताकद जिल्ह्यात वाढू लागली,” असे भोंडेकरांनी स्पष्ट केले. आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपने पंकज भोयर यांच्यावर ही जबाबदारी सोपविल्याचेही त्यांनी म्हटले.

Sharad Pawar NCP : दोन ठिकाणी मतदार नाव नोंदणी? राष्ट्रवादी शरद पवार गटाची कारवाईची मागणी!

 

दरम्यान, नव्या पालकमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभार मानतो. गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुरू असलेल्या कामाची दखल घेऊन माझी जबाबदारी वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. संजय सावकारे यांनी देखील चांगले काम केले आहे. मात्र भौगोलिकदृष्ट्या भंडारा त्यांच्यासाठी दूर पडत असावा, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला असावा.”
या घडामोडींनंतर भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदाचा हा बदल भाजपच्या रणनीतीचा भाग मानला जात आहे.

___