Santosh Dhuri : कुटुंब एकत्र येऊनही फायदा झाला नाही

Biting criticism by a leader who left MNS and joined BJP : मनसे सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्याची बोचरी टीका

Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ मधील महापालिका निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात काही भिन्न प्रतिक्रिया दिसून येत आहेत. ज्यांच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) माजी नेते आणि भाजपात प्रवेश केलेले संतोष धुरी यांचे विधाने आहे. संतोष धुरी यांनी निवडणूक निकालानंतर मनसेला घरचा आहेर दिला आहे.

धुरी हे माजी नगरसेवक आणि पूर्वी मनसेचे माजी नेता आहेत, पण निवडणुकीच्या काही काळापूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. निकालानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की ‘मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खूप मोठा गाजावाजा केला होता. मात्र, निकाल पाहता मनसेची अक्षरशः चेष्टा झाली आहे. यापूर्वी मनसेचे ८ नगरसेवक निवडून आले होते, पण आता कुटुंब एकत्र येऊनही मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले.”

BMC Election 2026 : मुंबई गेली, आता कोकणही जाणार? या कुटुंबाने सोडली ठाकरेंची साथ

उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची चर्चा होणार म्हणून संजय धुरी आणि संदिप देशपांडे यांना चर्चेपासुन दूर ठेवत अपमानास्पद वागणूक दिली होती. म्हणून संजय धुरी यांनी मनसेला अलविदा करत भाजपात प्रवेश केला. आता निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी मनसेवर टिका केली आहे.

“वरळीत मनसेची हक्काची एक जागाही जिंकता आली नाही. जाणीवपूर्वक शिवसेना ठाकरे गटाकडून तिथे दुसरा उमेदवार देण्यात आला. माहीम आणि दादर या मनसेच्या बालेकिल्ल्यांमध्ये पक्ष किती कमी फरकाने हरला आहे किंवा मागे पडला आहे, याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.” असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिला.

Nagpur municipal corporation election : मंत्री जयस्वालांनी आग्रह केला, उमेदवार पडला

तसेच त्यांनी मनसे कार्यकर्त्यांचा वापर चुकीच्या रीतीने झाला असल्याची टिकाही केली. ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती असूनही, मनसेने अपेक्षित यश मिळवले नाही आणि याचे परिणाम आतापर्यंतच्या निकालांमध्ये स्पष्ट दिसत आहेत. फडणवीस यांनी निवदणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का बसणार असल्याचे भाकित केले होते, ते खरे झाले आहे. यामुळे पक्षात प्रचंड नाराजी पसरली आहे.