Breaks Silence After Meeting with Chief Minister Fadnavis : मनसे नेते संतोष धुरी यांनी सोडले मौन, नितेश राणेंसोबत्त झाल्या गप्पा
Mumbai मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष धुरी यांनी नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं होतं, ते भाजप प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता त्यांनी मौन सोडलं आहे.
मनसे नेते संतोष धुरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनसेमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला, याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. धुरी यांनी सांगितले की, “नितेश राणे यांनी माझ्याशी संपर्क साधला. ते आमच्या कोकणातले आहेत. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या.”
फडणवीसांशी भेटीबद्दल ते म्हणाले की “मी फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी मला वेळ दिला आणि माझ्या भावना समजून घेतल्या. मी कोणावरही नाराज नाही.”
Municipal elections : ‘माझ्या पतीविरोधात…’ नवनीत राणांच्या भूमिकेचं बच्चू कडूंकडून कौतुक
मात्र राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की गेल्या काही काळात पक्षात काम करताना अनेक अडचणी आल्या आणि पक्षाच्या धोरणांबाबत धुरी यांना नाराजी होती. त्यामुळेच त्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
संतोष धुरी हे मनसेचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात. त्यांनी ठाणे जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.
संदीप देशपांडे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “संदीप देशपांडे हे माझे जुने मित्र आहेत. राजकारण एकीकडे आणि मैत्री एकीकडे असे मी मानतो. त्यांनी मैत्री ठेवली तर मीही मैत्री ठेवीन.”
Municipal elections : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील
धुरी यांनी फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थिती, ठाणे जिल्ह्यातील विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, ही भेट औपचारिक होती आणि त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही.








