Cases have been registered against 18 people from both groups : दोन्ही गटांतील १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
Washim : तालुक्यातील लोहगाव येथे महिला सरपंचपदाच्या अपात्रतेवरून दोन गटांत सशस्त्र संघर्ष झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून कारंजा ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
लोहगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच शारदा प्रकाश आहे यांच्या सदस्यत्व रद्द करण्यासाठी विरोधी गटाने याचिका दाखल केली होती. मात्र, विभागीय आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्व कायम ठेवत अपात्रतेचा आदेश रद्द केला. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या विरोधी गटाने सरपंचांच्या पतीवर हल्ला केला.
२१ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता सरपंचांच्या पती प्रकाश आहे (वय ५३) यांच्यावर कु-हाड आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेत त्यांचे नातेवाईकही जखमी झाले. शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.प्रकाश आहे यांच्या तक्रारीवरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी सुनिल राठोड, डिगांबर राठोड, सहदेव राठोड, आणि अन्य सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
Akash Fundkar : विविध योजनांचे लाभ वितरण व राष्ट्रीय मतदार दिन
दुसऱ्या गटाची फिर्याद
विरोधी गटाकडून सुनिल राठोड यांनी तक्रार दाखल केली असून त्यात प्रकाश आडे, रूषीकेश आडे, विक्रम आडे, आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गटाने दगड, पाईप, आणि कु-हाडींचा वापर करून हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
Collector Dr. Kiran Patil : कर्मचाऱ्यांनी खेळ आणि कलागुण सादर करून जिल्ह्याचे नाव
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या संघर्षाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत फिर्यादी रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओत आरोपी दुचाकीची नासधूस करताना दिसतात.
पोलिस निरीक्षक प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या घटनेने लोहगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण केले आहे.