व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Satara zp election : ‘त्या’ महिलेला १० कोटीं दिल्याचा शशिकांत शिंदेंचा गंभीर...

Satara zp election : ‘त्या’ महिलेला १० कोटीं दिल्याचा शशिकांत शिंदेंचा गंभीर दावा !

satara-zp-chairman-election-10-crore-allegation-shashikant-shinde : साताऱ्यात सभापती निवडीवरून खळबळ

Satara : सातारा जिल्हा परिषदेत सभापती निवडीवरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. एका महिला सभापतीला तब्बल १० कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे.

जिल्हा परिषदेत झालेल्या सभापती निवडीदरम्यान भाजपकडून फोडाफोडी केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. घोषणाबाजी, आंदोलन आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना असा संघर्ष उभा राहिल्याचे चित्र दिसत आहे.

Mva crisis : महाविकास आघाडीत फूट? राजकारणात खळबळ !

दरम्यान, या प्रकरणात मंत्री शंभूराज देसाई यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये स्पष्ट दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

शशिकांत शिंदे यांनी आरोप करताना सांगितले की, संबंधित सभापतीपदी निवड झालेल्या महिलेला १० कोटी रुपये देण्यात आले असून, आता कुणालाही अपात्र होण्याची किंवा पक्षीय कारवाईची भीती राहिलेली नाही. तसेच या प्रकरणात संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी याचिका दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Nana patole: महाराष्ट्रात आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

या निवड प्रक्रियेत काही पदे बिनविरोध भरली गेली असून, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी ऋतुजा विराज शिंदे, समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी ऋषीकेश धायगुडे-पाटील, तर विषय समिती सभापती म्हणून लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांची निवड झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. तसेच, अशोक खरात प्रकरणातील सीडीआर लीकबाबतही सखोल तपास व्हावा, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

याशिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी भूमिका स्पष्ट करत बारामती पोटनिवडणुकीत पक्ष उमेदवार देणार नसल्याचे सांगितले, तर राहुरीमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. साताऱ्यातील या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

__

error: Content is protected !!