Satara zp election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील गोंधळावरून विधानसभेत संताप

satara-zp-election-ruckus-shambhuraj-desai-slams-sp-tushar-doshi-suspension-order : शंभुराज देसाईंचा तुषार दोशींवर हल्लाबोल, निलंबनाचे आदेश

Satara : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाचे तीव्र पडसाद आता राज्याच्या विधिमंडळात उमटले असून शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त करत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणुकीवेळी पोलिसांकडून मंत्र्यांशी झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेवरून वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

विधिमंडळात बोलताना शंभुराज देसाई यांनी घटनेचे तपशील सांगत पोलिसांच्या वर्तनावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, अनेक पोलिसांनी एकत्र येत आम्हाला ओढत होते, कोणी हाताला, कोणी पायाला तर कोणी कंबरेला धरून खेचत होते. जणू काही गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडले जाते, अशा पद्धतीने मंत्र्यांशी वागणूक देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Ashok kharat case : तीन एफआयआर मधून समोर आली लैंगिक शोषण, अघोरी कृत्यांची भीषण मालिका

यावेळी शंभुराज देसाई यांनी तुषार दोशी यांच्या पूर्वीच्या कारकीर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला. त्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दोन वेळा मला त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते, तेव्हा परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. त्या वेळी तुषार दोशी यांची बदली का करण्यात आली, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या संपूर्ण ट्रॅक रेकॉर्डची चौकशी करावी, अशी मागणी करत त्यांनी साताऱ्यातील वर्षभरातील कारभारावरही प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे तसेच साध्या वेशातील पोलिसांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई व्हावी, असे देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच या घटनेत सहभागी असलेल्या पोलिसांची ओळख आपण देऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

Lpg gas cylinder : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये मोठा बदल

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.