Anil Deshmukh makes serious allegations against Dada Bhuse : शिक्षणमंत्र्यांच्याच मतदारसंघात घोटाळा झाल्याचा आरोप
Nagpur : नागपूर जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. काही बड्या अधिकाऱ्यांना या घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे, तर काहींचे निलंबनही करण्यात आले आहे. अशात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सरकारची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून आणि शाळांमध्ये बोगस बॅचेस (तुकडी) दाखवून सरकारची फसवणूक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात घडला आहे.
Muslim festivals : नितेश राणेंच्या ‘त्या’ वत्कव्यावर काय म्हणाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष ?
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या चौकशी करण्याची मागणी मी केली आहे. नाशिकमधील मालेगाव येथील शाळेला १८ फेब्रुवारी २०१४ रोजी आदेश जारी करून विनाअनुदान तत्त्वावर मान्यता देण्यात आली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत या संदर्भात माहिती मागितली. या काळात, बनावट कागदपत्रांच्या आधारे तुकडीला मान्यता मिळाल्याचे तथ्य समोर आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
Local Body Elections : ‘स्थानिक’ समोर दिसताच काँग्रेस अॅक्टीव मोडवर !
२८ ऑगस्ट २०१५ च्या निर्णयानुसार, नवीन तुकडीला मान्यता देता येत नाही. अशा परिस्थितीत जुन्या तारखेला आदेश जारी करून मालेगावातील १७ शाळांना मान्यता देण्यात आली. त्याला अनुदानही देण्यात आले. १०० हून अधिक शिक्षकांचीही बोगस भरती करण्यात आली. शिक्षक भरती घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.








