Breaking

School opening: विदर्भातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्याच दिवशी शुकशुकाट

Institutional protest against the government by keeping schools closed : संस्थाचालकांचे शाळा बंद ठेवून सरकार विरोधात आंदोलन

Nagpur News: विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र आजपासून सुरू झाले. मात्र बहुतांश शाळांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक शिक्षण संस्थांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळा बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज अनेक संस्था चालकांनी शाळा बंद ठेवल्या, त्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळाला. तर काही शाळा नियमाप्रमाणे सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

विदर्भातील काही शिक्षण संस्था चालकांनी आज एका दिवसासाठी सरकारला विरोध दर्शवण्यासाठी त्यांच्या शाळा सुरू केलेल्या नाही. शाळांना सरकारकडून मिळणारा वेतनेतन अनुदान गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित पद्धतीने दिला जात आहे. आरटीई अंतर्गत मिळू शकणारा शेकडो कोटी रुपयांचे अनुदान थकलेलं आहे. तसेच शाळा चालवण्यासाठी आवश्यक असलेला इतर खर्चही सरकारकडून दिला जात नाही अशी त्यांची तक्रार आहे.

Eknath Shinde Shiv Sena : शिंदेसेनेला नेत्यांमधील मतभेदाचे टेंशन; पूर्व विदर्भासाठी मास्टर प्लान!

 

शिक्षण संस्था चालकांसाठी शाळा चालवणे कठीण होऊन बसल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने या प्रतीनिधीक आंदोलनाचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद म्हणून आज नागपूरसह विदर्भाती शाळांनी त्यांच्या शाळा एका दिवसासाठी बंद ठेवल्यामुळे पहिल्या दिवशी शाळा भरू शकलेली नाही. अनुदान थकवलं तर शाळांनी कारभार चालवावा कसा ?
सतत अनुदान थकवलं जाईल तर अनुदानित शाळांनी कारभार कसा चालवावा? असा प्रश्न शिक्षण संस्था चालकांनी विचारला आहे.

Local Body Elections : स्थानिक निवडणुकांत तरुणांचा कौल ठरणार निर्णायक

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ही या एक दिवसीय शाळा बंद ठेवण्याचे आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, आमचे हे सर्व आर्थिक प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत आमचा शासनाची लढा सुरू राहील आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही विदर्भातील शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला. असे शिक्षण संस्था महामंडळाचे म्हणणे आहे.

___