Government preparing to impose new cess, bill likely to be introduced in Parliament : सरकारकडून नवीन सेस लावण्याची तयारी, संसदेत बिल येण्याची शक्यता
Delhi: तंबाखू, सिगारेट, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी धडक देणारा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येण्याची शक्यता असून या उत्पादनांवर अतिरिक्त सेस लावण्यासाठी नवीन बिल आज संसदेत सादर केलं जाण्याची चर्चा आहे. ‘हेल्थ सिक्युरिटी ते नॅशनल सिक्युरिटी सेस बिल 2025’ हे नाव असलेले हे बिल हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी लोकसभेत मांडण्याची तयारी झाली असल्याची माहित चर्चेला आली आहे.
या बिलामध्ये पान मसाला, तंबाखू, सिगारेट आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॅकिंग मशीन, फिल अँड सील मशीन, टिन बॉक्स, पाऊच पॅकिंग मशीन यासह संबंधित उपकरणांवर सेस लावण्याची तरतूद असणार आहे. त्यामुळे या उत्पादनांच्या किंमतीत मोठी वाढ होणार असून ग्राहकांचा खिसा आणखी गरम होणार आहे. तर दुसरीकडे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याचे चित्र आहे.
Job in Germany : जर्मनीत मिळणारी दहा हजार नोकऱ्यांची संधी हुकली,
विशेष म्हणजे हे बिल मनी बिलच्या स्वरूपात सादर होत असल्याने ते केवळ लोकसभेच्या मंजुरीवर कायद्याच्या रूपात लागू होऊ शकते. राज्यसभेला या बिलाला थांबवण्याचा अधिकार नसून फक्त 14 दिवसांत सूचना किंवा शिफारसी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हे बिल मंजूर होण्याच्या शक्यता अधिक मानल्या जात आहेत.
सरकार नवीन उत्पन्न संधींच्या शोधात असताना तंबाखू उद्योगाकडे लक्ष केंद्रीत केल्याने याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली नवा कर लागू करण्यामागे नेमका उद्देश काय, याची राजकीय दृष्टीनेही पडताळणी सुरू आहे. लागू झाल्यास तंबाखूजन्य पदार्थ उत्पादकांना उत्पादन क्षमतेनुसार श्रेणीवार मासिक सेस भरावा लागणार असून कमी उत्पादन क्षमतेपासून सर्वाधिक उत्पादन क्षमतेपर्यंत चार श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे.
Local Body Elections : महापालिका निवडणूक तयारीचा वेगाने आढावा
मासिक सेसची रक्कम दर महिन्याच्या सुरुवातीला, जास्तीत जास्त सात तारखेपर्यंत जमा करणे बंधनकारक ठरणार आहे. तंबाखू वापरावर नियंत्रण आणि महसूल वाढ या दोन्ही कारणांनी सरकार पुढील निर्णयाकडे वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत असून बिल सादर होताच सिगारेट, पान मसाला आणि तंबाखूचा शौक नागरिकांना अधिक महागात पडणार आहे.








