Nagpur to Amravati Vidarbha Sankalp Padyatra : नागपूर ते अमरावती विदर्भ संकल्प पदयात्रा मंगळवारी
Nagpur स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम निकाली निघण्याच्या दृष्टीने लोक सहभाग वाढावा, या हेतूने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपूर ते अमरावतीच्या दरम्यान विदर्भ संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे. एरवी आंदोलनात विदर्भवाद्यांची संख्या शंभरच्या वर जात नाही, त्यामुळे यात्रेत लोक कुठून येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पदयात्रेच्या माध्यमातून विदर्भवाद्यांना लोकांचे लक्ष वेधून घेऊ, असा विश्वास आहे. मात्र ते प्रत्यक्षात यात्रेतच दिसणार आहे. येत्या १३ मे रोजी दुपारी १ वाजता विदर्भ चंडिका, शहीद चौक, नागपूर येथून विदर्भवादी बाबा शेळके, सुनील चोखारे, मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात ४० विदर्भवादी सहकाऱ्यांसह विदर्भ संकल्प पदयात्रा निघेल. विदर्भाचा विकास करायचा असेल, तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. ही बाब लोकांपर्यंत पोहोचवून या आंदोलनात लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे.
Akash Fundkar : नागपुरात लवकरच जागतिक दर्जाचे वेल्डिंग इन्स्टिट्यूट
ही पदयात्रा नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातून जाऊन जनजागृती करून विदर्भावरील अन्यायाची गाथा गावागावातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न करणार करेल. या पदयात्रेचा समारोप २५ मे रोजी दुपारी ११ वाजता अभियंता भवन, शेगाव नाका अमरावती येथे पश्चिम विदर्भ मेळाव्याने होणार आहे.
Operation Sindoor : खासदाराने एक महिन्याचे वेतन दिले सैनिकांसाठी
या मेळाव्यात पश्चिम विदर्भातील सरपंच, कंत्राटी शिक्षक, अभियंते, कर्मचारी, तासिकेप्रमाणे काम करणारे प्राध्यापक, शिक्षक व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा यातील शिक्षक, प्राध्यापक, तसेच शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि बेरोजगार सहभागी होणार आहेत.