Decision taken in Vidarbha State Agitation Committee meeting : आंदोलन समितीच्या मेळाव्यात निर्धार
Amravati “स्वतःचं स्वतंत्र राज्य मिळाले तरच विदर्भातील जनतेला खरा न्याय मिळू शकतो,” असा ठाम विश्वास व्यक्त करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रविवार, २५ मे रोजी अमरावती येथे अभियंता भवन, शेरनवाडा नाका येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या मेळाव्यात कंत्राटी अभियंते, कर्मचारी, सरपंच आणि विविध स्तरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास दादेवाले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. डॉ. प्रवीर रघुवंशी, उद्योगपती नितीन मोहोड, प्रकाश पोहोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. प्रा. पांडुरंग चटगे, महिला आघाडीच्या नेत्या बनो रंजनराव मर्जी, युवा नेते मुकेश मसुरकर यांनीही भाषणात विदर्भाच्या वेगळ्या राज्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
MLA Shweta Mahale : स्टार्टअप चळवळ ही भारताच्या आर्थिक सुवर्णयुगाची नांदी
“जवानांसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ करता, पण शेतकऱ्यांसाठी अशा मोहिमा का राबवल्या जात नाहीत?” असा सवाल यावेळी करण्यात आला. शासनाच्या धोरणांवरही यावेळी प्रहार करण्यात आला. विदर्भ आंदोलनातील अनेक अनुभव त्यांनी यावेळी शेअर करत उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण केली.
Floods in Mumbai : मुंबईत राज्य सरकार आणि प्रशासन राजजी गटारगंगा, महायुतीने मुंबई बुडवली !
या कार्यक्रमात अरुण केदार (अन्न पूर्व विदर्भ), सुनील चहारे (ज्येष्ठ नेते), अॅड. सुरेश वानखडे (विदर्भ पदयात्रा प्रमुख) यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. एन. आर. राजपूत (अध्यक्ष, पश्चिम विदर्भ) यांनी केले तर सूत्रसंचालन कादंबरीकार डॉ. ए. एच. हड्डे यांनी केले.
या वेळी युवा अध्यक्ष मुकेश मारुरकर, ज्येष्ठ पत्रकार अरुण केदार, प्रभाकर कोठबंनवार, विष्णू आष्टेकर, सुनील होखारे, राजेंद्र आगरकर (जिल्हाध्यक्ष), रियाज अहमद खान (शहराध्यक्ष), गणेश कुरसाळे, दिलीप भोयर, सतीश प्रेमलवार आदी मान्यवर उपस्थित होते.