Rs 15,000 crore plan to convert to broad gauge : रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी १५ हजार कोटींची योजना
Amravati संपूर्ण विदर्भात ‘गरिबांचा रथ’ म्हणून ओळखली जाणारी आणि प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली शकुंतला रेल्वे २०१९ पासून बंद आहे. ही गाडी बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांना पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, लहान व्यापारी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी ही रेल्वे मोठा आधार होती. मात्र, ब्रिटिश काळातील हा ऐतिहासिक रेल्वेमार्ग आजही एका ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात असल्याने त्याच्या विकासात अडथळे येत आहेत.
भारतीय रेल्वे विभागाने या मार्गाचे अधिग्रहण करण्याची आणि नॅरोगेजला ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची योजना आखली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. हा निधी मंजूर झाल्यास विदर्भातील रेल्वे वाहतुकीला मोठा फायदा होईल आणि प्रवाशांची गैरसोय दूर होईल.
Education Minister of Maharashtra : २४ वर्षांपासून अनुदान नाही, प्राध्यापकांनी टाकले भाजीचे दुकान!
शकुंतला रेल्वेचा उगम १९१६ मध्ये झाला. ब्रिटिश राजवटीत विदर्भातील कापूस उद्योगाला चालना देण्यासाठी हा रेल्वेमार्ग उभारण्यात आला होता. अचलपूर–मूर्तिजापूर आणि यवतमाळ–मूर्तिजापूर या १८८ कि.मी. लांबीच्या मार्गावरून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक दोन्ही होत असे. विशेषतः कापसाच्या गाठी वाहून नेण्यासाठी या मार्गाचा उपयोग केला जात होता.
ही रेल्वे पूर्वी सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी (CPRC) या ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात होती. सीपीआरसीला हा मार्ग वापरण्यासाठी वर्षाला २ ते ३ कोटी रुपये रॉयल्टी दिली जात होती. मात्र, आता हा मार्ग अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेत सीपीआरसीने १२ ते १६ कोटी रुपयांच्या रॉयल्टीचा दावा केला आहे. त्यामुळे हा वाद अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
MLA Harish Pimple : पंतप्रधानांच्या ‘हर घर जल’ योजनेचा बट्ट्याबोळ!
शकुंतला रेल्वेच्या अधिग्रहणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असले, तरी अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी अजूनही कायम आहेत. रेल्वे मार्गाचा ताबा ब्रिटिश कंपनीकडून घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसेच, या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण, निधी संकलन आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याचे काम प्रलंबित आहे.








