Shalinitai Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन

Old age took its last breath at the age of 94 : वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास श्वास

Mumbai : राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांचे आज निधन झाले. वृद्धापकाळाने त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. मुंबईतील माहिम येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांचे निधन झाले.

शालिनीताई पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारपणाशी झुंज देत होत्या. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Sudhir Mungantiwar : अडथळ्यांनाही न जुमानता, मुनगंटीवारांचा वेग कायम!

वसंतदादा पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत शालिनीताई यांनी त्यांना खंबीर साथ दिली होती आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्या सक्रिय होत्या. शालिनीताई पाटील यांचे पार्थिव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असून तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

___