व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sharad Pawar NCP : तहसीलपुढेच ‘रमी’चा डाव; जळगाव जामोदमध्ये अभिनव आंदोलन

Sharad Pawar NCP : तहसीलपुढेच ‘रमी’चा डाव; जळगाव जामोदमध्ये अभिनव आंदोलन

Demands for agriculture minister’s resignation : कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची शरद पवार गटाची मागणी

Jalgao Jamod विधानभवनात सुरू असलेल्या कामकाजादरम्यान कृषिमंत्री माणिक कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ खेळत असल्याचा व्हिडिओ समोर येताच राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी अडचणीत असताना मंत्री रमीमध्ये रमले ही बाब निषेधार्ह असून कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने करण्यात आली आहे.

या संतप्त पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने २३ जुलै राेजी तहसील कार्यालयासमोर ‘रमीचा डाव’ मांडून अभिनव आंदोलन करण्यात आले. मंत्री कोकाटे यांच्या वागणुकीचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी प्रत्यक्ष पत्ते खेळून सरकारच्या असंवेदनशीलतेचा पर्दाफाश केला.

Amravati MIDC : कारखाने बंद झालेत, रोजगाराच्या संधीही घटल्या

या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रसेनजीत पाटील म्हणाले की, “राज्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळसदृश स्थिती आहे. हुमणी अळीचा प्रकोप, शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा, सोयाबीनची झालेली हानी — हे सारे प्रश्न गंभीर आहेत. अशा संकटात कृषीमंत्री विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतात, हे सरकार व राज्यासाठी शरमेची गोष्ट आहे.”

प्रसेनजीत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची विनंती केली आहे. मंत्र्यांच्या या वागणुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून महायुती सरकारची संवेदनशीलता आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

West Vidarbha : पश्चिम विदर्भातील प्रादेशिक असमतोलावर संशोधन

या आंदोलनात प्रसेनजीत पाटील, विश्वासराव भालेराव, प्रमोद सपकाळ, एम.डी. साबीर, इरफान खान, शेख जावेद, एजाज देशमुख, विष्णु रोठे, हनुमंत देशमुख, महादेव भालतडक, सिद्धार्थ हेलोड़े, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, वामन गुडेकर, श्रीकृष्ण जाधव, अकील शाह, तुकाराम गटमने आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

error: Content is protected !!