NCP Favors Including MNS in the Alliance : राष्ट्रवादीची अनुकूल भूमिका, काँग्रेस नेत्यांना फटकारले
Akola मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत काँग्रेसने तडकाफडकी भूमिका घेऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबाबत पवार सकारात्मक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी मनसेसोबत जाणार का, या प्रश्नावर पवार म्हणाले, “आघाडीतील सर्व नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. काँग्रेसने त्वरित टोकाची भूमिका घेऊ नये.” मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसचा विरोध असल्याच्या चर्चांवर त्यांनी हा सल्ला दिला.
Local Body Elections : भाजपने रणशिंग फुंकले! बावनकुळे म्हणतात, ‘आम्हीच जिंकणार’
मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अलीकडे जातीय राजकारणामुळे सामाजिक दुरावा निर्माण झाल्याचेही पवार म्हणाले. “मराठा, कुणबी आणि ओबीसी समाजांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण सुरू आहे, ते थांबले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणातील ‘भीष्म पितामह’ म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणात चुलत नातू पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला “गंभीर घोटाळा” म्हटल्याने, पवार म्हणाले की, “जर तसे असेल, तर चौकशी करून सत्य समोर आणावे.”
Local Body Elections : आजपासून धुमशान! न.पा.ची उमेदवारी ऑनलाइन; अनामत, प्रतिज्ञापत्र आवश्यक
दरम्यान, रात्री उशिरा कोरेगाव प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनी ‘अमेडिया’शी संबंधित आणखी एका जमीन घोटाळ्याचाही खुलासा झाला असून तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








