Protest for farmer’s issues on 14th July : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सिंदखेडराजात १४ जुलैला मोर्चा
Buldhana राज्य सरकारच्या धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाली आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंच्या नेतृत्वात १४ जुलै रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली, ज्यात पक्षाच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रातील माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, बाजार समिती व खरेदी-विक्री संघांचे पदाधिकारी तसेच बूथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Solar Scam : सोलर घोटाळा प्रकरणात नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा
मोर्चामार्फत सरकारच्या विरोधात विविध मागण्या लावून धरल्या जाणार आहेत. त्यामध्ये खतांच्या वाढलेल्या किंमती, पीकविमा योजना, वीजपुरवठा, वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान, शेतमालाचे हमीभाव, जिजाऊ नवनगर प्रकल्पातील दिरंगाई आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर प्रश्नांचा समावेश आहे.
Maharashtra Assembly Session : ‘होय, त्रिभाषा सूत्र आम्हीच स्वीकारलं, कम ऑन किल मी’
डॉ. शिंगणे यांनी सांगितले की, “आजच्या बैठकीत फक्त नियोजनावर चर्चा आहे, पण १४ जुलैच्या मोर्चात मी सरकारला थेट जाब विचारणार आहे. काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण योग्य वेळीच बोलेन.” त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी मोर्चात कोणती मोठी राजकीय टीका किंवा भूमिका मांडली जाणार, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व महिलांविषयी केलेल्या कथित निंदनीय वक्तव्याचा यावेळी बैठकीत निषेध करण्यात आला.