Sharad Pawar Party : एकत्र येण्याची कुठलीही चर्चा नाही !

NCP leader Anil Deshmukh says there is no talk of coming together : संजय राऊत यांना कदाचित वेगळी माहिती असेल

Nagpur : आम्ही अजित पवार यांच्या पक्षासोबत एकत्र येणार, अशी कुठलीही चर्चा आमच्या पक्षात नाही. त्यामुळे यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही आणि याला कुणाचा विरोध असण्याचाही प्रश्न नाही. एकनाथ खडसे यांच्याबद्दल अमोल मिटकरी काही बोलले असतीलही, पण एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत, ते शरद पवार यांच्यासोबत आहेत, असे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींची आम्ही चाचपणी करत आहोत. एकत्र लढायचं की स्वतंत्र हे अद्याप कुणाचंही ठरलेलं नाही. यावर आधी चर्चा करून मग निर्णय घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी त्या – त्या भागांतील परिस्थिती पाहून लढाव्या लागतात. महाविकास आघाडीसुद्धा स्थानिक समिकरणे बघुनच एकत्र लढायचं की नाही, हे ठरवेल, असे देशमुख यांनी सांगितले.

Chandrapur : मुनगंटीवारांनी घेतला विसापूर येथील निर्माणाधीन एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा !

संजय राऊत सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काय बोलले, हे माहिती नाही. पण एक मात्र खरे की, कुणी कितीही नाही म्हटलं तही संजय राऊत बोलल्यानंतर भाजपला ते गांभीर्याने घ्यावेच लागते. भाजप नेत्यांना दिवसभर त्याला उत्तरे द्यावी लागतात. नागपूर महानगरलिका निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे नेते रमेश बंग यांच्याशी चर्चा करू. सर्व आजी – माजी आमदारांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आमचे ठरले आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी १५ कुटुंबांना मिळवून दिली सव्वा कोटीची नुकसान भरपाई !

पावसाने शेतकऱ्यांसह जनसामान्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. ज्या पद्धतीने पावसाने नुकसान झाले, त्यानुसार मदत मिळाली पाहिजे. आता संत्र्याला मृग बहार फुटायला अडचण जाणार आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवरील ताण वाढवला आहे. सरकारने नुकसानग्रस्तांना मदत दिलीच पाहिजे, असे अनिल देशमुख म्हणाले.