Six hopefuls vie for three co-opted member positions : भाजपा-सेना युतीकडून ५ तर काँग्रेसकडून एकाचा दावा; १३ जानेवारीला होणार अंतिम फैसला
Shegao शेगाव नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी राजकीय हालचाली आता अंतिम टप्प्यात आल्या असून, शहराच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अवघ्या ३ जागांसाठी तब्बल ६ इच्छुकांनी अर्ज नेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरस अधिकच वाढल्याचे चित्र दिसत आहे. ९ जानेवारी रोजी अर्ज घेण्याच्या निर्धारित वेळेपर्यंत ६ जणांनी प्रशासकीय विभागातून अर्ज नेले असून, हे अर्ज आता जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
शेगाव नगरपरिषदेच्या २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, भाजपाचे १५ आणि शिवसेनेचे २ असे एकूण १७ सदस्यांचे संख्याबळ सत्ताधारी युतीकडे आहे. दुसरीकडे, काँग्रेस (६), एमआयएम (४), वंचित बहुजन आघाडी (२) आणि शिवसेना उबाठा (१) असे विरोधी पक्षांचे बलाबल आहे. नगरपरिषदेतील एकूण ३ स्वीकृत जागांच्या वाटणीमध्ये संख्याबळाचा विचार करता, भाजपा-सेना युतीच्या पारड्यात २ तर काँग्रेसच्या वाट्याला १ जागा जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Akola Municipal Corporation election : विकास मंचला इतर पक्षांच्या नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा
स्वीकृत सदस्यपदासाठी सत्ताधारी भाजपा-सेना युतीकडून राजेश अग्रवाल, ज्ञानेश्वर साखरे, दीपक ढमाळ, अरुण चांडक आणि अशोक डांबे या ५ जणांनी अर्ज नेल्याने युतीमध्ये कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याउलट, काँग्रेसकडून शैलेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने विरोधकांच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून कागदपत्रांची छाननी आणि नियमांची पूर्तता झाल्यानंतरच अंतिम उमेदवारांची नावे निश्चित होतील.
100 crore scam : मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजने अंतर्गत महावितरणमध्ये 100 कोटींचा घोटाळा !
पिठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १३ जानेवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत नियुक्ती केली जाणार आहे. या निवडीमुळे नगरपरिषदेतील आगामी काळातील राजकीय समीकरणे आणि सत्तेचे संतुलन कसे राहते, हे स्पष्ट होईल. भाजपाच्या कोट्यातील दोन जागांसाठी ५ इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, यावरून शहरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.








