Need to sub-categorize Scheduled Caste reservation : शिवसेना नेते विजय अंभोरे यांची मागणी, सोशल फोरमकडून निवेदन
Buldhana साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. अलीकडेच काँग्रेसला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या DCM Eknath Shinde शिवसेनेत प्रवेश करणारे विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात ही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात, ‘अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण तातडीने करण्यात यावे, तसेच क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी,’ अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
Vidarbha Farmers : सक्तीची कर्ज वसुली तात्काळ थांबवा; अन्यथा आंदोलन
‘1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणाचे अधिकार राज्य सरकारला दिले. त्यानुसार, सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑक्टोबर 2024 रोजी एक सदस्यीय समिती गठीत केली. या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा,” असे निवेदनात नमूद आहे.
सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “आरक्षण उपवर्गीकरण न झाल्यास जूनमध्ये होणारी नोकरभरती स्थगित करण्यात यावी.” तसेच, “माजी न्यायमूर्ती बदर समितीने अनुसूचित जातीतील 59 जातींची सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन वर्गीकरण करावे,” अशी मागणी करण्यात आली.
“गेल्या 20 वर्षांपासून सरकारने 68 शिफारशी स्वीकारल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बजेटमध्ये तरतूद करून सर्व संबंधित खात्यांना परिपत्रक काढण्यात यावे,” अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
Birth Certificate fraud : नायब तहसीलदारांनी दिलेले ५६११ जन्मदाखले रद्द
“20 एप्रिल 2025 पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण मातंग समाज 20 मे 2025 रोजी आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने उतरून आक्रमक आंदोलन करेल,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी सोशल फोरमचे संस्थापक आणि शिवसेना नेते विजय अंभोरे, प्रदेश कार्याध्यक्ष सोपानराव पानपाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, ओम प्रकाश नाटेकर, विलास सोनोने, गजानन गायकवाड, मधुकर गायकवाड, नंदा कडूबा मोरे, संगीता निकाळजे, रामेश्वर जाधव, संभाजी निकाळजे, विकी आव्हाड, गणेश गायकवाड यांसह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.