Shivrajabhishek : महाराष्ट्र’ चित्रपटाचा पहिला सीन शिवराज्याभिषेकाचा असावा!

CM Devendra Fadnavis fantastic response to Akshay Kumars question : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारच्या प्रश्नाला दिला भन्नाट प्रतिसाद

Mumbai : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीच्या निमित्ताने एकत्र आले, ‘फिक्की’ फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या विशेष कार्यक्रमात अक्षय कुमारने स्वतः फडणवीसांची मुलाखत घेतली, या वेळी झालेल्या संवादाने संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुलाखतीत अक्षयने फडणवीसांना एक हटके प्रश्न विचारला “जर तुम्ही एका दिवसासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक बनलात आणि त्या चित्रपटाचं नाव ‘महाराष्ट्र’ असेल, तर पहिला सीन कोणता ठेवाल?” क्षणाचाही विलंब न करता फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रावर चित्रपट बनत असेल, तर पहिला सीन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा असेल! ते सिंहासनावर बसलेले असतील, आणि इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर पुन्हा स्वराज्याचं निर्माण… तोच सीन माझ्या चित्रपटाचा पहिला फ्रेम असेल!”

Development Centre : महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी देशातील ‘मॅग्नेट’ !

या उत्तरावर सभागृहात जोरदार टाळ्या वाजल्या यानंतर अक्षयने विचारलं, “राजकारणातील रिअल हिरो कोण?” फडणवीस म्हणाले, राजकारणातील खरे हिरो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी! आपण ‘फ्रॅजाइल फाइव्ह’ इकोनॉमीतून आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत. २०४७ मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करणारे नरेंद्र मोदीच आहेत!”

मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीचाही विषय आला. अक्षयने विचारलं की “जेन झी पिढी मराठी चित्रपटांकडे वळावी, यासाठी तुमचं काही प्लॅन आहे का?”

Reservation controversy : आमच्या मनगटात ताकद नाही का?

त्यावर फडणवीस म्हणाले मराठी रंगभूमी हीच आपल्या सिनेमाची ताकद आहे. नटरंग, सखाराम बाईंडर, दशावतार अशी नाटकं आजही हजारो शोज करत आहेत. आज मराठी चित्रपटांना थिएटर मिळणं सोपं झालं आहे. दोन मराठी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होतात आणि दोन्ही हिट होतात! सरकार म्हणून आम्ही मराठी चित्रपटसृष्टीला मदत करतो आहोत आणि जेन झी पिढीला मराठी कंटेंटशी जोडण्यासाठी नवे प्रयत्न सुरू आहेत.”

या मुलाखतीत फडणवीसांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान, मराठी चित्रपटांचा उत्कर्ष आणि भारताच्या आर्थिक सामर्थ्याचं दृष्टीचित्र तिन्ही गोष्टींना एकत्र गुंफून ‘राजकारणातला रिअल हिरो’ कोण आहे, हे दाखवून दिलं.

____