Goa officials also took up the bow and arrow:
गोव्यातील पदाधिकाऱ्यांनीही हाती घेतला धनुष्यबाण
Mumbai: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन आज मुंबईतील उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय ठाणे तसेच गोवा राज्यातील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाने शिवसेना वर्धापन दिनीच मुंबईत उबाठाला धक्का बसला आहे.
आज उबाठाचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी, शाखाप्रमुख संजय जंगम, माजी नगसेवक विजेंद्र शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि शिवसेना युवा सेना सचिव मोहसीन शेख यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच गोवा राज्यातील उबाठा गटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशिनाथ मयेकर, पाच तालुकाप्रमुख, एक शहर प्रमुख, विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
Marathi Vs Hindi: हिंदी सक्तीचा वाद सुरु असताना नव्या पुरस्काराची घोषणा
ठाण्यातील रामचंद्रनगर शाखेचे उबाठाचे उपविभागप्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत सामील झालेल्या लोकप्रतिनिधींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या प्रभागांतील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.