Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेनेच्या दबावानंतर ग्रामपंचायत बॅकफुटवर!

Resolution for 50% tax exemption approved : मलकापूर ग्रामीण ग्रामसभेत ५०% करमाफीचा ठराव मंजूर

Malkapur शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या ‘डफडे बजाओ’ आणि आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासन अखेर माघारी फिरले असून ग्रामसभेत ५० टक्के घरकर करमाफीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. ही माहिती ग्रामसेवक दर्शन सुरळकर यांनी दिली.

१३ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामविकास विभागाने ‘समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ थकीत कर एकरकमी भरल्यास ५०% सवलत देण्याचा आदेश काढला होता. मात्र एक महिना उलटूनही मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीने हा लाभ लागू न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. ग्रामसेवक सुरळकर आणि प्रशासक प्रभाकर कानळजे शासन निर्णयाची अंमलबजावणी न करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.

Mahayuti Government : युती सरकारच्या शाळाबंदी धोरणाचा थेट फटका मुलींना

४ डिसेंबर रोजी शिवसेना (उबाठा)चे जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरिदास गणबास यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ३ दिवसांत सवलत लागू न केल्यास ८ डिसेंबरला डफडे बजाओ आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

त्यानंतरच प्रशासनाने तातडीने १० डिसेंबरला ग्रामसभा घेण्याचे लेखी आश्वासन दिले. आज सकाळी १० वाजता अनिलसिंह (कान्हा) राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. सभेला शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Local Body Elections : तिकिट हवी तर भाजपचीच, इच्छुकांची गर्दी वाढली

ग्रामसभेत घरकरावर ५०% करमाफी देऊन थकीत कर वसुली करण्याचा प्रस्ताव एकमुखी मंजूर झाला. ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत तात्काळ करभरणी सुरू केली. शिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा निर्णय मार्गी लागल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर आणि पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व ठळकपणे दिसून आले.