March on Panchayat Samiti office for housing fund : घरकुल निधीसाठी आक्रमक; अधिकारी अडथळे निर्माण करत असल्याच्या तक्रारी
Amravati रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना यांसह विविध सरकारी योजनांतर्गत ग्रामीण भागात घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना निधी टप्प्याटप्प्याने मंजूर केला जातो. मात्र, दर्यापूर तालुक्यात पहिला धनादेश मिळाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील धनादेशासाठी पंचायत समिती कार्यालयातील संबंधित अधिकारी अडथळे निर्माण करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
लाभार्थ्यांकडून पैसे मागणे, फाईल मुद्दाम थांबवणे, धनादेश लटकवणे अशा प्रकारांची माहिती समोर येताच शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुख प्रमोद धानोकार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. १७) मोठा मोर्चा पंचायत समिती कार्यालयावर नेण्यात आला. घरकुल मंजूर लाभार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी थेट अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.
Manikrao Kokate : पीक उत्पादन खर्च कमी करण्यासाठी समिती नियुक्त करणार !
या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, नंतर सहायक गटविकास अधिकारी चंदू ढवक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सात दिवसांच्या आत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित निधी जमा करण्याची मागणी करण्यात आली. “आम्हाला सात दिवसांची मुदत द्या, सर्व घरकुल लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निधी वितरित करू,” असे आश्वासन ढवक यांनी दिले. त्यांनी संबंधित अभियंत्यांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेशही दिले.
यावेळी तालुका प्रमुख प्रमोद धानोकार यांनी इशारा दिला की, “सात दिवसांच्या आत निधी वितरण न झाल्यास शिवसेना पुन्हा तीव्र आंदोलन करेल आणि पं. स. कार्यालयातच ठिय्या देईल.”
Harshawardhan Sapkal : याज्ज्ञवल्क्य जिचकार पुन्हा काँग्रेसमध्ये !
या आंदोलनात महिला आघाडी जिल्हा प्रमुख अलका नीलेश पारडे, विधानसभा संघटक बबन विल्हेकर, शहर प्रमुख गोपाल अग्रवाल, मोहन बायस्कार, किशोर टाले, संजय घरडे, गुणवंत गावंडे, उपशहर प्रमुख दीपक बगाडे, माजी तालुका प्रमुख गणेश लाजूरकर, संदीप धर्माळे, सुनीता मांडवे, रामचंद्र गवळी, अमोल भदे, भारत गावंडे, सचिन वारुडकर तसेच अनेक शिवसैनिक व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.