Breaking

Shobha Fadnavis : शोभा फडणवीसांना आजच जाग का आली?

 

Shobha Fadnavis suddenly appeared on the stage of BJP’s foundation day program : भाजपच्या स्थापना दिन कार्यक्रमाला अचानक अवतरल्या

Chandrapur शोभा फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या काकू आहेत. माजी मंत्री म्हणूनही त्यांची एक ओळख आहे. पण राजकारणातील नव्या पिढीला ही ओळख फारशी ज्ञात नाही. एरवी जिल्ह्याच्या राजकारणापासून चार हात लांब राहणाऱ्या शोभा फडणवीस काल अचानक भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी मंचावर अवतरल्या. त्या केवळ आणि केवळ आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध करण्यासाठी. ज्यांची ओळख विकासपुरूष अशी ओळख आहे. जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या इच्छाशक्तीने झपाटलेले आहेत. अशा मुनगंटीवारांचा विरोध करण्याऱ्या शोभा फडणवीस यांच्याच भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याच्या गेल्या १५ वर्षांच्या राजकारणात डोकावून पाहिले असता, शोभा फडणवीस यांचे राजकारण सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधातच राहिले आहे. त्यांचा कालचा वावर बघून, हा केवळ विरोधासाठी विरोध आहे, याची प्रचिती येते. त्या येवढ्या ‘न्यूट्रल’ आहेत, तर मग आमदार किशोर जोरगेवार यांच्याच मंचावर जाऊन त्यांनी भाषण का ठोकले? एखाद्या पारदर्शक मंचावरून किंवा सोशल मिडियावरूनही त्या आपले मत व्यक्त करू शकल्या असत्या, अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

Devendra Fadnavis : पुतण्या मुख्यमंत्री, तरीही काकूंवर आली आंदोलनाची वेळ!

शोभाताई की पुतना मावशी ?
शोभाताई या चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरातील रहिवासी आहेत. गेल्या १५ वर्षांत त्यांनी भाजपच्या एकाही उमेदवारासाठी साधी सभा घेतली नाही, की प्रचारासाठी फिरल्या नाहीत. सुधीर मुनगंटीवार असो की हंसराज अहिर, कोणाच्याही प्रचारात त्या दिसल्या नाहीत. अन् आता अचानकपणे पक्षहितासाठी त्या सरसावल्या. याला काय म्हणावे? पक्षासाठी त्यांनी आजवर काय केले, हे दाखवावे, असे आव्हान त्यांना स्थानिक कार्यकर्ते देत आहेत.

विनाकारण भाजपची काँग्रेसशी तुलना करून बेगडी प्रेम दाखवू नये. काल त्यांनी पक्षाविषयी दाखवलेले प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असल्याची टिका भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केली जात आहे.

Nagpur riots : मुख्यमंत्र्यांनी घेतला यू-टर्न, नासीर खान यांचा आरोप

चंद्रपूर जिल्हा बॅंकेचे अध्यष संतोष रावत २०२४च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मतदारसंघातून भाजप उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसकडून उभे होते. त्या रावतांना शोभा फडणवीस यांनी बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच्या काळात मदत केली. निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात त्यांनी रावतांसाठी काम केले. अशा या बेगडी राजकीय व्यक्तीने निष्ठावान, कर्तृत्ववान आणि विकासाचा ध्यास घेतलेल्या मुनगंटीवारांना तरी किमान पक्षहित आणि निष्ठा शिकवू नये, येवढी माफक अपेक्षा भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.