Government confident of promoting local trade and indigenous products : सरकारला विश्वास; स्थानिक व्यापार व स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन
Akola महायुती सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापने (दारू विकणारी ठिकाणे वगळून) २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने व्यापारी, ग्राहक तसेच विविध क्षेत्रातील घटकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. या उपक्रमामुळे आर्थिक व्यवस्थेला बळकटी मिळून रोजगाराच्या संधी वाढतील, तसेच ग्राहकांना कोणत्याही वेळी आवश्यक वस्तू उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कामगारमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सर्वांचे हित लक्षात ठेवून घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजप प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व समस्त मंत्रिमंडळाचे आभार मानले. “हा निर्णय समाजातील सर्व घटकांचा विचार करून घेतला असून महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल,” असे ते म्हणाले.
Bacchu Kadu : विरोधक चुकीचे वागले म्हणून मी अध्यक्ष झालो, अल्पमत असूनही सत्ता आमच्याकडे
निर्णयाचे महत्त्व
व्यापाराला चालना मिळणार
रोजगाराच्या संधी वाढणार
बँकिंग व आर्थिक क्षेत्राला बळकटी मिळणार
ग्राहकांना २४ तास सेवा उपलब्ध होणार
स्थानिक व्यापार व स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन
या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, तर ऑनलाईनमुळे वाढत असलेल्या परदेशी वस्तूंच्या वापराला आळा घालून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल, असे खासदार अनुप धोत्रे यांनी नमूद केले.
राज्याचे कामगार व जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर म्हणाले, “हा निर्णय शेतकरी, व्यापारी, ग्राहक आणि कामगार यांच्या हिताचा आहे. शासन कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून हा उपक्रम राबवणार आहे.”
Dussehra gathering : पूरग्रस्तांना दिलासा, उद्धव ठाकरेंना टोला आणि मोदींचं कौतुक !
या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करणाऱ्यांमध्ये आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल, योगेश गोतमारे, जयश्रीताई पुंडकर, वैशालीताई शेळके, सुमनताई गावंडे, चंदाताई शर्मा, कुसुमताई भगत, पवन महल्ले, माधव मानकर, अंबादास उमाळे, राजेश नागमते, ऍड. रूपाली काकड, ऍड. देवाशिष काकड, रमेश अलकरी, आम्रपाली उपरवट, संजय गोटफोडे आदींचा समावेश आहे. भाजप नेत्यांनी म्हटले की, “या निर्णयामुळे व्यापाराला चालना मिळेल, रोजगार वाढतील आणि ग्राहकांना चोवीस तास सेवा उपलब्ध होईल.”








