Breaking

Siddharth Kharat : बियाणं, खत, औषधं उधारीवर आणले… सगळंच पाण्यात गेलं

Farmers affected by unseasonal rains : शेतकऱ्यांनी आमदारापुढे मांडली व्यथा; प्रशासनाला धरले धारेवर

Buldhana मेहकर तालुक्यातील गौंडाळा परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. मूग, उडीद, भुईमुग यांसारख्या पिकांमध्ये पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं कंबरडे मोडलं आहे. अश्यात सांत्वन करण्यासाठी पोहोचलेल्या आमदारांकडे शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. बियाणं, खत, औषधं उधारीवर आणले… सगळंच पाण्यात गेलं, असं शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं.

या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार सिद्धार्थ खरात यांनी तात्काळ शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. “पिकांवर पाणी आणि डोक्यावर कर्ज – शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळाली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल,” असा इशारा त्यांनी महसूल प्रशासनाला दिला.

Maharashtra Navnirman Sena : चिखलीतील वृक्षतोडीकडे वन विभागाचं दुर्लक्ष

आमदार खरात यांनी तहसील प्रशासनाला स्पष्ट शब्दांत निर्देश दिले – “पंचनामे कागदावर नकोत, जमिनीवर व्हायला हवेत! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या.” या दौऱ्यात त्यांच्या सोबत ऍड. आकाश घोडे (युवासेना तालुका प्रमुख), सरपंच गजानन जाधव, डॉ. सार्थ सिद्धार्थ खरात, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे तसेच मंडळ अधिकारी, तलाठी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Election-of-the-purchasing-and-selling-organization : खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत ‘छत्री’ विरुद्ध ‘हेलिकॉप्टर’

यावेळी प्रशासन व आमदार यांच्यात प्रत्यक्ष शाब्दिक चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. खरात यांनी स्पष्टपणे सांगितले, “हे केवळ नैसर्गिक संकट नाही, ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी आहे.”शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता तात्काळ निर्णय आणि अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे, हीच या दौऱ्याची ठळक मागणी बनली आहे.शेतकऱ्यांना न्याय आणि भरपाई मिळावी, हीच आता सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.