Sindkhedraja grampanchayat : खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत बंडाची ठिणगी; सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव

No-confidence motion against the Sarpanch : ८ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात राजकीय संघर्ष तीव्र

Sindkhed raja खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, नऊपैकी आठ सदस्यांनी सरपंचांविरोधात उघड बंड पुकारत अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या घडामोडीमुळे ग्रामपंचायतीतील सत्तासंघर्ष चिघळला असून स्थानिक राजकारण तापले आहे.
सरपंच नलिता राजेंद्र गरुड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत विद्या लहाने, प्रकाश गरुड, नंदा तळेकर, दत्तू तळेकर, अलका नागरे, जनार्धन नागरे, मीनाक्षी म्हस्के आणि सुनीता भालेराव या आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

Sudhir Mungantiwar : अधिकाऱ्यांची मुजोरी खपवून घेणार नाही! गोंडवाणा विद्यापीठाच्या उपकेंद्रावरून सुधीर मुनगंटीवार संतापले

सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव, निर्णयप्रक्रियेत सदस्यांना विश्वासात न घेणे आणि विकासकामे ठप्प असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच सरपंच पतीकडून कारभारात कथित हस्तक्षेप, सदस्यांशी समन्वयाचा अभाव आणि विकासकामांतील अनियमितता या मुद्द्यांवरही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Protest by anganwadi karmachari : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार; FRS रद्द व शासकीय दर्जासाठी आंदोलन

या घडामोडींमुळे ग्रामपंचायतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे. बहुमत सदस्यांनी एकत्र येत भूमिका घेतल्याने सरपंच गटातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील विशेष सभेत नेमका काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.