Speed breakers : शेगावात ‘मागेल त्याला गतिरोधक’चा सुळसुळाट; वाहनधारकांचे कंबरडे मोडले!

shegaon-unplanned-speed-breakers-issue-nagarpalika-politics : नगरसेवकांकडून ‘काम’ दाखवण्यासाठी चढाओढ की दिखावा? ‘सतावेध’ विशेष राजकीय विश्लेषण

Shegao राज्यात ‘मागेल त्याला शेततळे’ किंवा ‘मागेल त्याला सौरपंप’ या सरकारी योजना गाजत असताना, संत नगरी शेगावात मात्र सध्या ‘मागेल त्याला गतिरोधक’ ही एक नवीच अनौपचारिक योजना राबवली जात असल्याची उपरोधिक चर्चा रंगली आहे. नवनियुक्त नगरसेवकांमध्ये आपल्या प्रभागात काहीतरी ‘मोठे’ काम केल्याचे दाखवण्यासाठी चढाओढ लागली असून, या चढाओढीचा फटका मात्र सर्वसामान्य वाहनधारकांना आणि पर्यटकांना बसत आहे.

शास्त्रीय निकषांना हरताळ फासून ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या या गतिरोधकांमुळे शहराचा नियोजित विकास की निव्वळ राजकीय दिखावा, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अनेक प्रभागांत नवीन नगरसेवक सक्रीय झाले आहेत. मात्र, मूलभूत नागरी सुविधा आणि दीर्घकालीन विकासकामांवर लक्ष देण्याऐवजी, मतदारांना तात्काळ काहीतरी ‘दिसणारे’ काम दाखवण्यासाठी गतिरोधकांचा आधार घेतला जात असल्याचे चित्र आहे.

Sanjay Kute : संबळ हाती घेत आमदार रंगले गोंधळात!

गतिरोधक उभारताना सहसा शाळा, रुग्णालय किंवा अपघातप्रवण क्षेत्रांचा विचार केला जातो. मात्र, शेगावात परिस्थिती वेगळी आहे. भारतीय रस्ते काँग्रेसच्या (IRC) नियमावलीनुसार गतिरोधकाची उंची आणि रुंदी असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे गतिरोधक वाहनधारकांसाठी अपघाताचे निमंत्रण ठरत आहेत.

वर्दळीचे चौक सोडून अगदी छोट्या गल्ल्यांमध्येही नगरसेवकांच्या दबावामुळे गतिरोधक उभारले जात आहेत. यामुळे रुग्णवाहिका आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे नियोजन करण्याऐवजी अशा ‘तुकडा’ कामांवर निधी खर्च केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Mahadev Munde murder case : बहुचर्चित महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपासाचा निर्णायक टप्पा

या सर्व प्रकारामुळे नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांच्या प्रशासकीय पकडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नगरसेवकांच्या मनमानी मागणीपुढे प्रशासन झुकत आहे की काय, अशी शंका शहरवासीयांना येत आहे. आपल्याच सहकाऱ्यांवर आणि प्रशासनावर नगराध्यक्षांचा कितपत वचक राहतो, यावरच शेगावच्या भविष्यातील नियोजनबद्ध विकासाची दिशा ठरणार आहे.