Breaking

Stampede at Triveni Sangam : कुंभमेळ्यात गेलेले पश्चिम विदर्भातील भाविक सुरक्षित

Devotees from West Vidarbha are safe : त्रिवेणी संगमातील चेंगराचेंगरीमुळे वाढली चिंता

Akola प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्याच्या दिवशी लाखो भाविकांनी पवित्र शाही स्नान केले. पश्चिम विदर्भातूनही सुमारे २५,००० भाविकांनी सनातन धर्माच्या परंपरेनुसार स्नानासाठी प्रयागराज गाठले. मात्र, रात्री सुमारे १ वाजता त्रिवेणी घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविक जखमी झाले. या दुर्घटनेत अंदाजे 38 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम विदर्भातील भाविकांच्या सुरक्षिततेची पाहणी करण्यात आली. खासदार अनुप धोत्रे, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी भाविकांशी थेट संपर्क साधला. त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली. तसेच, उत्तर प्रदेशच्या विशेष कक्षाशी व प्रयागराज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

Nitin Gadkari Devendra Fadnavis गडकरी-फडणविसांनी एकमेकांना दिले श्रेय!

अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील भाविक सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध शासकीय यंत्रणांशी संपर्क साधला. तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेण्यात आली. खासदार अनुप धोत्रे व पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी मेला प्रबंधक समितीचे मंत्री शर्मा यांच्याशी थेट संवाद साधून मदतकार्याची माहिती घेतली.

या दुर्घटनेबद्दल भाजप नेत्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना राज्य शासनातर्फे सर्वतोपरी मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेची माहिती घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्नानासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

आजच्या दिवशी तब्बल १२ कोटींहून अधिक भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करत आहेत. सामाजिक समरसता आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या स्नान पर्वावर घडलेली दुर्घटना दुर्दैवी असली तरी, भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.

Cooperative Banks : उच्च न्यायालयाच्या निर्णयाने सहकार क्षेत्रात गोंधळ

भाजप प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांचे सुपुत्र विनय जोशी, अकोल्यातील व्यापारी श्याम कुमार खंडेलवाल, केशव हेडा, जनक शर्मा, हरीश उपाध्याय, शंकर पाटील, संजय गावंडे, राजेश यादव आदींच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्यात आला. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.