Statement of former CM : खोट्या आरोपांनी वनवास, भाजपने दिला सन्मान !

Ashok Chavan strongly criticizes Congress : अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर जोरदार टीका

Latur : माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. लातूर ग्रामीणमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील अनुभव उलगडले. काँग्रेसमध्ये असताना खोट्या आरोपांच्या आधारे आपल्याला संपविण्याचा प्रयत्न झाला, पण भाजपने सन्मानाने पक्षात घेतलं आणि त्यामुळे आज आपण खासदार आहोत, असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं.

चव्हाण म्हणाले, “2010 मध्ये माझ्यावर निष्कारण खोटे आरोप करण्यात आले. त्यावेळी मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 2008 ते 2010 हा माझ्या कारकिर्दीतील शिखराचा काळ होता. मात्र कुठलीही चूक न करताही मला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला.”

India Vs Pakistan cricket match : ‘माझं कुंकू, माझा देश’, सरकारचा निषेध!

त्यांनी काँग्रेसवर टीका करताना मतचोरीच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली. “मतचोरी झाली असती तर नाना पटोले अडीचशे मतांनी जिंकले असते का?” असा सवाल त्यांनी काँग्रेस नेत्यांना केला.

भाजपची स्तुती करताना चव्हाण म्हणाले, “काँग्रेसमध्ये मला चौदा वर्षे अन्याय सहन करावा लागला. पण भाजपमध्ये मला मान-सन्मान मिळाला. पक्षाने सन्मानपूर्वक प्रवेश दिला, त्यामुळेच मी आज खासदार म्हणून कार्यरत आहे.”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं की, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्यात येईल. “निजामकालीन गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशीच सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि त्यात यशही आले आहे,” असं ते म्हणाले.

Local Body Election : काँग्रेस लागले कामाला, विधानसभानिहाय नेमले प्रभारी

अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं, मंत्रीपद सांभाळलं, मात्र आदर्श घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांना सत्तेतून दूर व्हावं लागलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता ते राज्यसभा खासदार म्हणून सक्रिय आहेत.