Sudhir Mungantiwar ; ‘केशवा… माधवा…’ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वरांनी भारावले भजनी

Bhaktirasat Rangla Bhajan Sohla, this appreciation on social media : भक्तिरसात रंगला भजनसोहळा, समाज माध्यमांवर ही कौतुक

Chandrapur : जेव्हा आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः ‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’ हे भजन सादर केले. तेव्हा सभागृहात ताल, सुर आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण निर्माण झाले. तुकुम येथील अय्यप्पा मंदिर सभागृह भक्तिरसाच्या स्वरांनी दुमदुमून गेले, आयोजकांच्या आग्रहावरून मंचावर उभे राहून मुनगंटीवार यांनी गायलेले हे भजन समाजमाध्यमांवरही कौतुकाचा विषय ठरले आहे.

या प्रसंगी मुनगंटीवार म्हणाले, “भजन हे केवळ गीत नसून ते अध्यात्माची अनुभूती देणारे, श्रद्धा आणि एकात्मतेला बळ देणारे शक्तीस्थान आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची प्रेरणादायी ऊर्जा भजनातून मिळते. ही परंपरा जिवंत राहावी म्हणून भजन मंडळांना आवश्यक साहित्य समर्पित करीत आहे.”

Akola West : अकोला पश्चिम निवडणुकीचे रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणी

चंद्रपूर ग्रामीणमधील ३० भजन मंडळांना साहित्याचे वाटप करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी यावेळी केली. “या साहित्यामुळे भजन सेवेच्या माध्यमातून भक्तिभावाला अधिक बळ मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फक्त भाषणात नव्हे, तर स्वतःच्या सुरेल आवाजातूनही अध्यात्मिक भक्तीभावाचा अनुभव घडवून मुनगंटीवार यांनी सर्वांची मने जिंकली. उपस्थितांमध्ये एक वेगळाच भावनिक उत्साह दिसून आला. भजन संपल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि क्षणभरासाठी सर्वजण भक्तिरंगात तल्लीन झाले.

या कार्यक्रमात विकासकामांचा आढावा घेताना मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, राम मंदिरासाठी काष्ठ पाठविण्याचा अभिमान, तसेच कोराडी व पंढरपूरसारख्या ठिकाणी उभारण्यात येणारी मंदिरे यांचा उल्लेख करत भक्ती आणि विकास यांचा संगम अधोरेखित केला.

Local Body Elections : महापालिका प्रभाग रचनेच्या प्रारूपावर १३३ आक्षेप

भक्तिरसात न्हालेल्या या सोहळ्यात मुनगंटीवार यांचे भजन सर्वांसाठी अविस्मरणीय ठरले. सभागृहातून बाहेर पडताना अनेकांच्या ओठांवर एकच ओळी होती “केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा…”