Sudhir Mungantiwar : बंगाली समाजाच्या विकासासाठी मुनगंटीवारांचे मोठे पाऊल!

Chandrapur Bengali societys gratitude towards Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती बंगाली समाजाची कृतज्ञता

Chandrapur: चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत अद्ययावत आणि आधुनिक मासोळी बाजार उभारणीसाठी ५ कोटी ९५ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवून दिल्याबद्दल चंद्रपूर येथील बंगाली समाजाच्या वतीने राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या निर्णयामुळे स्थानिक मच्छी विक्रेते, व्यापारी आणि मच्छिमार बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बंगाली समाजाचे प्रतिनिधी अजय सरकार यांनी मांडलेल्या मागणीला आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत २०२३ मध्ये राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री असताना चंद्रपूर बंगाली कॅम्प येथील आधुनिक मासोळी बाजाराला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याचबरोबर पालघर जिल्ह्यातील सातपाडी येथे मत्स्यव्यवसायीक बांधवांच्या मागणीनुसार तेथील आधुनिक मासोळी बाजारालाही प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे आ.मुनगंटीवार याप्रसंगी म्हणाले

Sudhir Mungantiwar : महाराष्ट्रातील अव्वल ‘१०० टक्के सौर ग्राम’ म्हणून उथळपेठची ऐतिहासिक नोंद

उभारण्यात येणाऱ्या या आधुनिक मासोळी बाजारामुळे स्वच्छता, साठवणूक, प्रक्रिया आणि विक्रीसाठी आवश्यक सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना सुरक्षित आणि सुसज्ज वातावरणात व्यवसाय करता येणार असून ग्राहकांनाही दर्जेदार सुविधा मिळतील. आगामी वर्षात हे दोन्ही मासोळी बाजार मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बांधवांच्या सेवेत समर्पित केले जातील, असा दृढ विश्वास या प्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

यावेळी बंगाली समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमास बंगाली समाजाचे पदाधिकारी, व्यापारी, मच्छी विक्रेते तसेच इरई धरण मच्छिमार सहकारी संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या प्रयत्नांतून एसएनडीटीला १०० कोटीचा निधी

आ.सुधीर मुनगंटीवार यांनी बंगाली कॅम्प परिसरासाठी आणखी काही महत्त्वाच्या विकासात्मक आश्वासनांची घोषणा यावेळी केली. बंगाली बांधवांना कमी खर्चात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता यावेत यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक सभागृह उभारण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. तसेच बंगाली कॅम्प परिसरातील रहिवाशांना जमिनीचे निवासी मालकी पट्टे देण्याचे आश्वासन दिले.

Sudhir Mungantiwar : आ.मुनगंटीवार यांची गोवंश पोषण, कुरण व शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी आग्रही मागणी

याशिवाय बंगाली कॅम्प परिसरातील भाजी मार्केट अधिक सुसज्ज व व्यवस्थित करण्यात येणार असून, परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक किंवा पुतळा उभारण्यात येणार आहे. आरोग्य सुविधांच्या दृष्टीनेही मोठा निर्णय घेत मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर हॉस्पिटलजवळ सुमारे ५ एकर परिसरात १५ कोटी रुपये खर्च करून धर्मशाळा उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प परिसराचा सर्वांगीण विकास होणार असून, स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास बंगाली समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.