Breaking

Sudhir Mungantiwar : ऑक्सीजनला मिटर लागलं, तर आपलं काही खरं नाही !

Chandrapur Sudhir Mungantiwar convinced of the importance of environmental protection सुधीर मुनगंटीवार यांनी पटवून दिलं पर्यावरण रक्षणाचं महत्व

Chandrapur Environment Conference : पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होतो आहे. काही संघटना, कार्यकर्ते पर्यावरण रक्षणासाठी घरावर तुळशीपत्र ठेऊन काम करत आहेत. पण तेवढ्याने भागणार नाही. तर प्रत्येकाला मैदानात उतरावं लागणार आहे. पाणी आणि विजेप्रमाणे ऑक्सीजनलाही जर मिटर लागलं, तर मग काही खरं नाही, असे राज्याचे माजी वनमंत्री तथा बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मूल येथे तृतीय राष्ट्रीय पर्यावरण संमेलन २०२५ चं उद्घाटन रविवारी (५ जानेवारी) झालं. यावेळी आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, संमेलनाच्या आयोजकांनी विविध राजकीय पक्षांच्या लोकांना या व्यासपीठावर आमंत्रित केलं. पर्यावरणावर प्रेम करण्याऱ्या हिरव्या मनाच्या लोकांना एकत्रित करून यशस्वीपणे संमेलन आयोजित केलं, यासाठी त्यांचं कौतुक आहे. यातून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन पुढच्या अधिवेशनापर्यंत पर्यावरण रक्षणाचं इश्वरीय कार्य करावं, अशी अपेक्षा आहे.

Lonar Lake : शंभर शाळा लोणार सरोवराच्या भेटीला !

जिवनात आनंदी राहण्यासाठी धन महत्वाचं आहे. पण मन प्रत्येक जन्मासाठी महत्वाचं आहे. या जन्माच्या शेवटच्या श्वासापर्यंत धन महत्वाचं आहे. ८४ लक्ष योनीचा प्रवास करून आपल्याला जेव्हा जेव्हा पुन्हा जन्म घायचा आहे. तेव्हा तेव्हा पुढच्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून वन महत्वाचं आहे. पर्यावरण रक्षण हे लोकआंदोलन व्हावं, असा प्रयत्न मी वनमंत्री असताना केला. २५५० स्क्वे. किलोमीटरने ग्रीन कव्हर वाढवलं. त्यासाठी चार लिम्का बुक रेकॉर्ड मिळाले आणि दोन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मिळाले. ही जनआंदोलनाची चळवळ आपल्याला पुढे नेण्याची आवश्यकता आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

जन्मापासून मृत्यूपर्यंत नात्या गोत्यातील सर्व जण कधी ना कधी कामी येत असतील, यात शंका नाही. पण शेवटच्या प्रवासाला वनातील लाकडंच कामी येतात, असे म्हणत त्यांनी जिवनातील वनांचे महत्व अधोरेखीत केले. आत्ताच्या परिस्थितील जेवढा ऑक्सीजन आपण घेतो आहे, त्याची बाजारात किंमत २१०० रुपये आहे.

MVA : बोलो इतने दिन क्या किया?

आपलं आयुष्य ८० वर्ष आहे, असं गृहीत धरलं. तर ६ कोटी १३ लाख २० हजार रुपयांचा ऑक्सीजन आपण घेतो. विजेसारखं मिटर लागलं नाही म्हणून ठीक आहे. भविष्यात तसं झालं, तर परिस्थिती अवघड होणार आहे. प्रत्येकाने २००० रुपयांची झाडं लाऊन मोठी केली पाहिजे. एकदमच गरीब व्यकी असेल, तर त्याने किमान २०० रुपयांचे झाडे लाऊन मोठी करावी आणि किमान आपल्यापुरता ऑक्सीजन निर्माण होईल, अशी व्यवस्था करावी, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.