Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांच्या घामाचा द्या दाम,२० हजार बोनसवर मुनगंटीवार ठाम !

sudhir-mungantiwar-demand-20000-bonus-per-hectare-for-paddy-farmers-meeting-with-chhagan-bhujbal : आ. सुधीर मुनगंटीवार यांची सरकारकडे आग्रही मागणी, मंत्री छगन भुजबळ यांचा सकारात्मक प्रतिसाद

Chandrapur: धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गतवर्षी पाठपुरावा करत शेतकऱ्यांना तब्बल १६२८ कोटी रुपयांचा बोनस मिळवून दिला होता. यावर्षीही त्यांनी त्याच जिद्दीने धान उत्पादकांसाठी पुढाकार घेत प्रति हेक्टर २० हजार रुपयांच्या बोनसची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा करून ही मागणी ठामपणे मांडली असून, त्यांच्या या प्रयत्नांना भुजबळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्च आणि मजुरीच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी प्रती हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी ठाम मागणी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Vijay Wadettiwar : अजित पवारांच्या विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ खराब? विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘दाल मे कुछ काला है!’

बैठकीदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी उत्पादन खर्चात झालेली लक्षणीय वाढ, मजुरीचे दर आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निदर्शनास आणून दिले. धान उत्पादकांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा आणि त्यांचे नुकसान टाळावे यासाठी यावर्षी तातडीने प्रती हेक्टर २० हजार रुपयांचा बोनस जाहीर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

२०२५-२६ च्या पणन हंगामात धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याचाही मुद्दा या बैठकीत अग्रक्रमाने चर्चिला गेला. पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्यवस्थापन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थिती यावर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील ३९ खरेदी केंद्रांवर ९१ हजार ६७१ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली असून सध्या मंजूर असलेले ५.४७ लाख क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अनेक केंद्रांवर दोन ते तीन लाख क्विंटल धान ऑनलाइन नोंदीअभावी उघड्यावर पडून असल्याची गंभीर बाबही त्यांनी मांडली.

पीक पाहणी अहवालानुसार चंद्रपूर जिल्ह्यात यंदा आठ ते दहा लाख क्विंटल उत्पादनाचा अंदाज आहे. मात्र वाढीव उद्दिष्ट न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात धान खरेदीबाहेर राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने किमान तीन लाख क्विंटलचे अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करून पुढील कार्यवाहीचे आदेश देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.

मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मांडलेल्या या मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवली असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने सक्रिय भूमिका घेतल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

Municipal Corporation Navi Mumbai : ई-गव्हर्नन्स निर्देशांकात नवी मुंबई अव्वल, पुण्याचा दुसरा क्रमांक

मागील वर्षी त्यांच्या प्रयत्नांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना १६२८ कोटी रुपयांचा धान बोनस मिळाला होता, तसेच चंद्रपूर जिल्ह्यात २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. धान उत्पादकांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.