Forest Minister Ganesh Naik said, Sudhirbhau, we will make your role successful : सुधीर मुनगंटीवार यांनी ताडाळीच्या फर्निचर क्लस्टरसाठी मागितले ७५ कोटी
Mumbai : अयोध्येतील राम मंदिर, नवीन संसद भवन येवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयासाठी माझ्या मतदारसंघातून लाकुड पाठवले. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांची खुर्चीही आपण पाठवलेल्या लाकडापासूनच बनत आहे. आपल्या येथील लाकडाचा दर्जा जगाला माहिती आहे. त्यामुळे ताडाळी येथे फर्निचर क्लस्टर तयार झाल्यास आपल्या लाकडापासून तयार झालेले फर्निचर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्येही पाठवता येईल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडाळी एमआयडीसीमध्ये १० एकर जागा घेतली आहे. तेथे फर्निचर क्लस्टर तयार करायचं आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये मी ७५ कोटी रुपये मागितले. पण त्याची तरतूद केली नाही. हे ऐतिहासीक कार्य करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या उत्तरात हे ७५ कोटी रुपये घोषीत करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
Department of Marketing : अमरावती बाजार समितीत राजकारण पेटले
दोन वर्षांत १० निकष, ७० उपनिकष आणि २११ पोटनिकषांची अंमलबजावणी करून आपण लाकडाच्या संदर्भात एफएससी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसीमध्ये आपण १० एकर जागा घेतली. ८०० ते ९०० कोटींचे सागवान आपण विकतो, तर त्याचं व्हॅल्यू अॅडीशन केलं पाहिजे. येथे तयार झालेलं फर्निचर आपण अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचवू शकलो पाहिजे, असा मानस त्यांनी व्यक्त केला.
मंत्र्यांनी फक्त आश्वासन द्यावे. मग वित्त विभागात ती फाईल कुणीही थांबवू शकत नाही. हा माझा अनुभव आहे. कारण मी वित्तमंत्री होतो, वनमंत्रीही होतो. गेली ३० वर्षे आमदार आहे. मंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर वित्त विभागात ती फाईल रोखण्याची कुणाचीही ताकद नाही, असे आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले.
Akola-Washim District Central Bank : कर्ज पुनर्गठन घोटाळा पोहोचला विधिमंडळात!
आमदार मुनगंटीवार यांच्या अनुदानाच्या मागण्यांवरील प्रश्नाला उत्तर देताना ‘सुधीरभाऊ तुमची भूमिका रेटून धरू, रेटूनच धरणार नाही तर यशस्वी करू’, असा शब्द वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. ते म्हणाले, मी १०० टक्के सहमत आहे. तुमची योजना यशस्वी करू. वित्त विभागाने अडचण दाखवलीच तर सीएसआरच्या माध्यमातून फंड उभा केला जाईल. वन खातं स्वतःच्या पायावर समर्थ आहे. बजेटमधून पैशाची अपेक्षा न करता. तुमची भूमिका यशस्वी करू, असेही वनमंत्री नाईक यांनी सांगितले.