Leadership consistently focuses on amenities basic matters related common man : सामान्यांशी संबंधित सुविधा, मूलभूत बाबींवर सातत्याने लक्ष केंद्रित करणारे नेतृत्व
Chandrapur : राजकारणात मोठमोठ्या घोषणा नेहमीच केल्या जातात, मात्र सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंधित सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सन्मानजनक परिसर या मूलभूत बाबींवर सातत्याने लक्ष केंद्रित करणारे नेतृत्व म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार ओळखले जातात. ‘दिला शब्द, केला पूर्ण’ हे त्यांच्या विकासकार्याचे ब्रीद राहिले असून चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांची भूमिका सर्वसमावेशक असल्याचे अधोरेखित झाले आहे.
बल्लारपूर मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल भागांच्या विकासासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निर्णय केवळ शासकीय औपचारिकता नसून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आणि समावेशक विकासाच्या भूमिकेचे ठोस प्रतिबिंब मानले जात आहे. मतांच्या राजकारणापेक्षा विश्वासाच्या राजकारणावर भर देणारी ही भूमिका त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात सातत्याने दिसून आली आहे. त्यामुळेच चंद्रपूर असो वा बल्लारपूर, मुनगंटीवार यांचे नेतृत्व सर्व समाजघटकांचा विकास साधणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
महायुतीवर ‘पाईप चोर, गुन्हेगारांना मत द्या’ असे सांगण्याची वेळ
मंजूर निधीतून दुर्गापूर, उर्जानगर आणि बल्लारपूर नगरपरिषद हद्दीतील मस्जिद, चर्च, गुरुद्वारा तसेच विविध सार्वजनिक स्थळांच्या परिसरात संरक्षण भिंती उभारणे, पेव्हर्स ब्लॉक बसवणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि सौंदर्यीकरणाची कामे प्रस्तावित आहेत. ‘जिथे गरज आहे, तिथे निधी’ ही कार्यपद्धती मुनगंटीवार यांच्या विकासदृष्टीकोनाची ओळख ठरत असून धर्म, राजकारण किंवा मतभेद यापलीकडे जाऊन स्थानिक वास्तव लक्षात घेऊन विकास साधला जात असल्याचे यातून स्पष्ट होते.
अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजना सन २००८-०९ पासून अस्तित्वात असली, तरी प्रत्येक मतदारसंघाला तिचा लाभ मिळतोच असे नाही. सन २०२५-२६ साठी बल्लारपूरचा या योजनेत समावेश होणे हे केवळ योगायोग नसून नियोजन, प्रशासकीय समन्वय आणि राजकीय इच्छाशक्तीचे फलित आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सक्रिय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा असल्याचे स्पष्ट होते.
Ladki bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्यावेत !
हा ७५ लाख रुपयांचा निधी अल्पसंख्याक समाजासाठी केवळ आर्थिक मदत नसून ‘मी तुमच्या सोबत आहे’ असा ठाम विश्वास देणारा संदेश मानला जात आहे. आकड्यांपुरता मर्यादित न राहता हा निधी सातत्य, संवेदनशीलता आणि समावेशकतेच्या राजकारणाची ओळख म्हणून पुढील काळात लक्षात राहणार असून त्याचा केंद्रबिंदू आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्व असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.








