MLA Mungantiwar warns road officials : आमदार मुनगंटीवारांचा रस्ते अधिकाऱ्यांना इशारा
Chandrapur : चंद्रपूर-मुल महामार्गावरील खड्ड्यांनी अक्षरशः जीवघेणी स्थिती निर्माण केली आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला.
“खड्डे बुजवा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे!” अशा ठाम शब्दांत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला. जनतेच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारे हे खड्डे तात्काळ बुजवले गेले पाहिजेत, अन्यथा मी शांत बसणार नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी निर्देश दिले. “रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित राहावा, ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ती मी निभावणारच,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार मुबलक युरीया, मुनगंटीवारांनी दिले निर्देश !
दरम्यान, पावसाळा ओसरताच चंद्रपूर-मुल रस्ता कायमस्वरूपी सुरक्षित व टिकाऊ व्हावा यासाठी मुनगंटीवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन दिले आहे. या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत गडकरींनी संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिट करण्याची तातडीने कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले. त्यासोबतच या मार्गावर रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यालाही मान्यता मिळणार असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.
Sudhir Mungantiwar : ‘सुधीरभाऊ, तुम्हाला सहकार्य करायला आरपीआय सदैव तयार !’
यामुळे वाहतुकीचा दीर्घकाळचा प्रश्न मार्गी लागणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, तत्काळ खड्डे बुजविण्याचा इशारा आ. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे प्रयत्न, चंद्रपुरात लवकरच गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र
वारंवार खराब होणाऱ्या रस्त्यावर करदात्यांचे पैसे सारखे खर्च होतात. डांबरी रस्त्यांवर दरवर्षी पावसात खड्ड्यांचे साम्राज्य वाढत राहते. आणि नागरिकांना त्याचा जीवघेणा त्रास सहन करावा लागतो त्यासाठी हा रस्ता सिमेंटचा व्हावा यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांनी आक्रमक शब्दात “जनतेच्या जीवाशी खेळ सहन केला जाणार नाही!” असा संदेश देत अधिकाऱ्यांना रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत.








