MLA Sudhir Mungantiwars shock, his voice was raised in the Legislative Assembly : आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उठवला होता आवाज
Mumbai : ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या कार्यपद्धती संदर्भात नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात गंभीर आरोप समोर आले. विधानसभेत माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाधव यांच्या दादागिरी आणि गैरव्यवहारावर तीव्र प्रहार केले. सुधीरभाऊंच्या दणक्यानंतर अखेर वादग्रस्त अधिकारी राकेश जाधव यांच्या बदलीचे आदेश आज निघाले आहेत.
ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर अधिवेशनात गंभीर प्रश्न उपस्थित करत, संबंधित अधिकाऱ्याचे तात्काळ बदली करण्याची ठाम मागणी राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच शिस्त व पारदर्शकतेची अपेक्षा असते; मात्र यात झालेल्या कथित अनियमितता आणि निष्काळजीपणामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यावर शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, असेही आ.मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
Cancer Hospital : दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय चंद्रपूर जिल्ह्याच्या कीर्तीत भर घालणार
रेतीसारख्या संवेदनशील विषयात प्रशासनाची भूमिका प्रश्नांकित करणारी गंभीर बाब समोर आली, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबत झालेल्या आरोपावर अधिवेशनात चर्चा झाली. या चर्चेत सहभाग घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्याच्या दादागिरी आणि गैरव्यवहारावर प्रहार केला. आणि अशा व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी सरकारने ठाम आणि ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी अशी मागणी लावून धरली,
अवैधरित्या होत असलेल्या रेती वाहतुकीप्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई न करता केवळ किरकोळ दंड आकारून ट्रॅक्टर सोडून देण्यात आल्याने कर्तव्यात कसूर झाल्याचा आणि आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या संदर्भातील फाईल तब्बल ३२ दिवस डीजी कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आल्याने प्रशासकीय कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Sudhir Mungantiwar : अडथळ्यांनाही न जुमानता, मुनगंटीवारांचा वेग कायम!
या प्रकरणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ठाम भूमिका विधानसभेत मांडत संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी केली. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विभागीय चौकशी सुरू असून, अहवाल प्राप्त होताच तात्काळ निलंबन करून एसीबीमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वस्त केले होते. आमदार मुनगंटीवार राकेश जाधव यांची तत्काळ बदली केली नाही तर होणाऱ्या चौकशीत हस्तक्षेप होण्याची शक्यता वाढू शकते असे सांगितले. आज यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून राकेश जाधव यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.








