Mungantiwar’s phone call sets officials into motion : महिलांनी केली होती तक्रार, मुनगंटीवारांनी अधिकाऱ्यांना स्वतः लक्ष घालण्याचे दिले निर्देश
Chandrapur राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कामाची स्टाईल साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ऑन दि स्पॉट निकाल लावण्यावर त्यांचा भर असतो. असाच एक अनुभव नागरिकांना पुन्हा एकदा आला. एका कार्यक्रमात गेले असता काही महिलांनी रस्त्याच्या कामाबद्दल तक्रार केली. त्यावेळी मुनगंटीवारांनी त्याच ठिकाणाहून थेट कार्यकारी अभियंत्यांना फोन केला आणि कंत्राटदाराला तंबी देण्याचे निर्देश दिले.
चंद्रपूर तालुक्यातील छोटा नागपूर येथे आमदार मुनगंटीवार कबड्डी स्पर्धेसाठी गेले होते. त्यावेळी माजी सरपंच किरण अलोने या महिलेने शिष्टमंडळासोबत आमदार मुनगंटीवार यांची भेट घेतली आणि मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार मांडली. मुनगंटीवार यांनी तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना विचारणा केली. या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी रुपये दिल्यानंतरही कासवगतीने काम का सुरू आहे, असा सवाल केला.
Political movements : अजित पवारांना अखेरचा निरोप दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग
मुनगंटीवार यांनी कार्यकारी अभियंत्यांना फोन करून स्वतः लक्ष घालायला सांगितले. ‘मी सध्या छोटा नागपूरमध्ये आहे. या रस्त्यासाठी एक कोटी रुपये दिले होते. पण एवढ्या संथगतीने काम सुरू आहे. हा रस्ता तातडीने करायला लावा. गावातील रस्त्यांवर विशेष लक्ष देत चला. शेतकरी धान्य पिकवतो तेव्हा ठेकेदाराच्या ताटात अन्न येते, याची जाणीव त्याला करून द्या. तुम्ही स्वतः त्याकडे लक्ष द्या,’ असे निर्देश त्यांनी दिले होते.
ZP election : वाद्य-फटाक्यांना फाटा, घरोघरी जाऊन साध्या पद्धतीने प्रचाराचे आवाहन
नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, शेतकऱ्यांची वाहतूक आणि शेतीमालाच्या दळणवळणावर होणारा परिणाम लक्षात घेता या रस्त्याचे काम कोणताही विलंब न करता तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः तात्काळ पाहणी करून काम सुरु करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले. विशेष म्हणजे तात्काळ काम सुरू झाले.








