Possessor of many such proactive ideas of public service – Nitin Gadkari : देशाला प्रगतीशील भक्कम मार्ग दाखविणाऱ्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस
Chandrapur : आज देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांचा वाढदिवस. ही केवळ एका व्यक्तीच्या जन्माची तारीख नाही. तर दूरदृष्टी, विकास, कार्यकुशलता आणि जनसेवा या चतुरस्त्र गुणांचा गौरव करण्याचा, नव्हे तर या गुणांतून देशाला प्रगतीशील भक्कम मार्ग दाखविणाऱ्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे.
बालपणी सायकल रिक्षातून जाताना रिक्षा ओढणाऱ्या व्यक्तीचे कष्ट बघून बालकाचं मन व्यथित झालं. त्या बालकाला मनोमन वाटलं आपण या रिक्षाचालकांसाठी काहीतरी करावं… बालपणीचा तो विचार प्रौढपणात कृतीत उतरवून गरीब रिक्षावाल्यांना परवडेल अशा ई-रिक्षा तयार करण्याची संकल्पना वास्तवात उतरली. जनसेवेच्या या अशा अनेक कृतीशील विचारांचे धनी म्हणजे आपले श्री. नितीन गडकरी…
Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले मुनगंटीवारांचे जनसंपर्क वाहन
रोडकरी, पुलकरी, ‘विकासाचे बब्बर शेर’ अशी देशभर ओळख असलेल्या आमच्या या नेत्याच्या कायकर्तृत्वाचा गौरव करण्याचा आजचा दिवस आहे. गडकरी हे केवळ तंत्रज्ञानप्रिय नेते नाहीत, ते समाजहिताला वाहिलेलं व्यक्तिमत्त्व आहेत. ई-रिक्षा हे त्याचे उत्तम उदाहरण. केवळ वाहन नव्हे, तर हजारो कुटुंबांना स्वाभिमानाने जगण्यासाठी रोजगाराचा पर्याय त्यांनी दिला. फुटाळा फाउंटेन, वर्धा रोडवरील ऑक्सिजन पार्क, नागपूरचे समृद्ध रस्ते आणि उड्डाणपूल या सर्व योजना म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला मूर्त स्वरूप देणाऱ्या योजनांची यशोगाथा…
गडकरी यांची कार्यपद्धती ठाम, स्पष्ट आणि परिणामाभिमुख आहे. त्यांनी संकल्प केला की तो पूर्ण होतोच. अडथळ्यांना सामोरे जात, चिकाटीने आणि शांत व आत्मविश्वासाने देशाच्या पायाभूत विकासाला गती देणं हेच त्यांच्या जीवनकार्याचं सार आहे. त्यांच्याबद्दल नेहमीच बोललं जातं, ‘मातीला हात लावला की हजारो किमीचे ‘एक्सप्रेस सुपर हायवे’ तयार होतात, पाण्याला हात लावला की ‘वॉटर वे’ तयार होतात, पहाडाला हात लावला की जगप्रसिद्ध टनल तयार होतो आणि कार्यकर्त्याला हात लावला की त्याचा नेता तयार होतो, असा परीस म्हणजे नितीन गडकरी…’
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांकडून मदतीचा हात अन् सुरेखा शिंदे स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या!
माझा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास त्यांच्या सुसंवाद, सहकार्य आणि प्रेरणादायी नेतृत्वाने समृद्ध झाला आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
गडकरी म्हणजे नावात न मावणारा पुरुषार्थ !आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि यशोशिखराच्या नव्या उंचीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मा. नितीनजी! आपलं कार्य असंच देशासाठी प्रेरणादायी ठरू देत, हिच माता महाकालीकडे प्रार्थना…
— सुधीर मुनगंटीवार
आमदार , बल्लारपूर विधानसभा क्षेत्र