Sudhir Mungantiwar : आदिवासी समाजाच्या विकास, हक्क सशक्तीकरणासाठी सदैव कटिबद्ध

Statement by Sudhir Mungantiwar at the World Tribal Day celebration : जागतिक आदिवासी दिन सोहळ्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

Chandrapur : आदिवासी समाज हा केवळ आपल्या सात्विक जीवनशैलीसाठीच नव्हे, तर पराक्रम आणि अथक परिश्रमासाठीही ओळखला जातो. निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा, परंपरा, संस्कार आणि निष्ठा जपणारा हा समाज देशाच्या विकास प्रवासात मोलाचा वाटा उचलतो. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वातून आदिवासी भगिनींना आणि समाजाला मिळालेला आत्मविश्वास हा अभिमानाचा विषय आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जागतिक आदिवासी दिवसानिमित्त पोंभूर्णा येथे आयोजित कार्यक्रमात केले.

जागतिक आदिवासी दिवसानिमित्त पोंभूर्णा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे जिल्हाप्रमुख जगन येलके, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, सचिव हरी कोडापे, महिला अध्यक्षा उषा आलाम, महादेव मडावी, कवडू मडावी, कांता मडावी, गीता कुळमेथे, गीता कोवे, भीमराव मरसकोल्हे, सामाजिक कार्यकर्ता गणेश परचाके तसेच समाजाच्या महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, लाडक्या बहीणींच्या सर्व इच्छा व्हाव्या पूर्ण !

आमदार मुनगंटीवार यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी एवरेस्ट शिखर सर केले, ही शक्ती त्यांच्या अंगी जन्मजात आहे. योग्य संधी मिळाल्यास हेच विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जागतिक पातळीवर झेंडा फडकवू शकतात. आदिवासी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे त्यांच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हीच खरी प्रगती असेल, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.