Sudhir Mungantiwar direct attack on Vijay Wadettiwar : सुधीर मुनगंटीवारांचा विजय वडेट्टीवारांवर थेट हल्लाबोल
Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली आहे. चंद्रपूरच्या विकासाबाबत काँग्रेसकडे सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही, असे स्पष्ट करत मुनगंटीवार यांनी वडेट्टीवार यांच्या राजकारणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांत कोणतीही ठोस विकासकामे न करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना आज विकासावर बोलण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट मत मुनगंटीवार यांनी मांडले. काँग्रेसने केवळ जातीपातीचे, मतांच्या सेटिंगचे आणि फुकट आश्वासनांचे राजकारण केले असून प्रत्यक्षात सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल झाला, याचे उत्तर काँग्रेस देऊ शकत नाही, असा आरोप त्यांनी केला.
BMC Election 2026 : मुंबईच्या रणधुमाळीत ‘मस्त-मस्त’ तडका, रवीना टंडन ठाकरेंसाठी मैदानात!
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसच्या काळात चंद्रपूर जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे पडला होता.सैनिकी शाळा, मेडिकल कॉलेज, २८० कोटी रुपयाचे कॅन्सर हॉस्पिटल, वन अकादमी,६०० कोटींचे एसएनडीटी विद्यापीठ, बांबू संशोधन केंद्र, रामसेतू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबूपेठ येथील ब्रिज, चंद्रपूर अत्याधुनिक बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, जुबली हायस्कूल,जीएसटी भवन, एपीजे अब्दुल कलाम गार्डन, ऑक्सिजन पार्क, बाबूपेठ अत्याधुनिक स्टेडियम, सिमेंट रस्ते, गटार योजना, सुंदर न्यायालय, वनभवन, ताडोबाभवन, ऑटो रिक्षा चालकासाठी अल्प दरात घरे, नियोजन भवन, आदिवासी होस्टेल, ओबीसी हॉस्टेल, स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक, अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट ही सर्व कामे भारतीय जनता पार्टीच्या काळात झाली आहेत. विकासाची ही यादी पाहिली तर काँग्रेसच्या दहा वर्षांच्या कामगिरीवर आपोआप पडदा पडतो, असे ते म्हणाले.
BMC Election : मुंबई महाराष्ट्राचीच; ‘बॉम्बे आंतरराष्ट्रीय शहर’ वक्तव्यावर नव्या संघर्षाची ठिणगी
काँग्रेसकडे आज केवळ लोकांची दिशाभूल करण्याशिवाय काहीच उरलेले नाही. विकासाऐवजी दारूची दुकाने, भ्रष्टाचार आणि खोट्या आश्वासनांचे राजकारण हीच काँग्रेसची ओळख बनली असल्याचा आरोप करत मुनगंटीवार यांनी मतदारांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.








