Sudhir Mungantiwar : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे टपाल तिकिट झाले, आता गौरवग्रंथ काढण्यासाठी प्रयत्न करणार !

Sudhir Mungantiwar honored at postage stamp release program : राज्यसभेचे उपसभापती म्हणून वंचित, अस्पृश्य आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी लढा दिला

Chandrapur : “कोळसा खाणीमध्ये हिरे सापडत नाहीत, पण त्या खाणीच्या परिसरात एक कोहिनूर जन्म घेतो आणि समाजातील अंधार दूर करतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे चंद्रपूरचे असेच कोहिनूर होते,” अशा शब्दांत माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनकार्याचा गौरव केला.

महानगरपालिका पटांगण, गांधी चौक येथे आयोजित त्यांच्या जन्मशताब्दीप्रित्यर्थ भारत सरकारतर्फे टपाल तिकीट विमोचन कार्यक्रमात ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले की, “लंडनमध्ये जाऊन अनेकांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली, पण बहुतेकांनी ती पदवी धन कमवण्यासाठी वापरली. मात्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी मनं जिंकण्याचा मार्ग निवडला. त्यांच्याकडे बँक बॅलन्स नव्हतं, पण लोकांच्या डोळ्यांत अमाप प्रेम आणि स्नेह होता. जे स्वतःसाठी जगतात त्यांचे स्थान स्मशानात असते, पण जे समाजासाठी जगतात त्यांचे स्थान प्रत्येकाच्या अंतःकरणात असते.”

Sudhir Mungantiwar : पोंभूर्णा होणार राज्यातील आदर्श तालुका !

ते पुढे म्हणाले, “राज्यसभेचे उपसभापती म्हणून त्यांनी वंचित, अस्पृश्य आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. भूमिहीनांचा प्रश्न असो किंवा अस्पृश्यतेविरोधातील संघर्ष असो, त्यांनी नेहमी अन्यायग्रस्तांच्या हक्कासाठी आवाज उठवला. त्यांचे प्रत्येक भाषण हे दीपस्तंभासारखे आहे.”

मुनगंटीवार यांनी खोब्रागडे यांच्या कार्याला पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. “बॅरिस्टर खोब्रागडे हे फक्त खोब्रागडे कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी जगले. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्र शासनाने एक ‘गौरव ग्रंथ’ प्रकाशित करावा, अशी आमची अपेक्षा आहे. या ग्रंथाचे प्रकाशन चंद्रपूरमध्ये होऊन नवीन पिढीला ‘जीवन कसे जगावे’ याचा मंत्र मिळेल,” असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी पुन्हा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार मुबलक युरीया, मुनगंटीवारांनी दिले निर्देश !

 

 

राजाभाऊ खोब्रागडे कुठल्याही टपाल तिकीटांपेक्षा मोठे होते. अनेकांना माहिती नसेल पण नवबौद्धांच्या सवलतीसाठी जेव्हा संघर्ष झाला, तेव्हा त्या लढ्याचा विजय राजाभाऊंच्या कर्तृत्वाने झाला. २५ सप्टेंबर ही तारीख म्हणजे दुर्मीळ योग आहे. कारण आजच्या दिवशी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे आणि याच दिवशी राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्व आहे, असेही आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले.

Sudhir Mungantiwar : खड्डे बुजवा, नाहीतर गाठ माझ्याशी !

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण खोब्रागडे होते. व्यासपीठावर काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, पदवीधर आमदार अभिजित वंजारी, सुधाताई खोब्रागडे, पोस्टल विभागाचे अधिकारी एस. रामाकृष्ण, देशक खोब्रागडे, मारोतराव खोब्रागडे, प्रतिक डोर्लीकर,किशोर सबाने आदी होते.