Sudhir mungantiwar : गुढीपाडव्याला कष्टकऱ्याला दिली नवी उभारी; मुनगंटीवारांकडून हातठेला भेट

Sudhir-Mungantiwar-provided-a-new-cart-to-a-handcart-vendor : मंगल दिवशी हातठेलावाल्याच्या आयुष्याला नवी उभारी

Chandrapur भानापेठ वार्डातील पुंडलिक नारायण सोनकुसरे हे गेल्या तीस वर्षांपासून गिरनार चौकात हातठेल्यावरून चणे-फुटाणे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र त्यांचा जुना, जीर्ण व तुटका हातठेला त्यांच्या रोजच्या व्यवसायात अडथळा ठरत होता. ही बाब सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आली. मग ठेल्याची डागडुजी कशाला, ठेलाच नवीन घेऊन देण्याची योजना मुनगंटीवारांनी आखली. दिवस निवडला गुढीपाडव्याचा. मुनगंटीवारांनी त्यांना स्टीलचा चार चाकी नवीन हातठेला भेट देऊन त्यांच्या नव्या प्रवासाला शुभारंभ करून दिला.

गुढीपाडव्याच्या पवित्र आणि मंगलमय दिवशी एका सर्वसामान्य कष्टकऱ्याच्या आयुष्यात आशेचा नवा किरण उजळवणारी हृदयस्पर्शी घटना चंद्रपूरमध्ये घडली. भानापेठ वार्डातील पुंडलिक नारायण सोनकुसरे हे मागील तीस वर्षांपासून गिरनार चौक येथे हातठेल्यावरून चणे-फुटाणे विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र त्यांचा लाकडी हातठेला अत्यंत जीर्ण आणि तुटक्या अवस्थेत असल्यामुळे त्यांना रोजच्या व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांच्या या परिस्थितीची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संवेदनशीलतेने पुढाकार घेत, त्यांना स्टीलचा चार चाकी नवीन हातठेला भेट स्वरूपात देत त्यांच्या जीवनात नवी उभारी दिली.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा प्रशासनाच्या उदासीनतेवर सभागृहात कडक प्रहार

या उपक्रमातून एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे जिवंत उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर त्वरित उपाय करणे, ही सुधीर मुनगंटीवार यांची कार्यशैली या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या उपस्थितीत या नव्या हातठेल्याचे उद्घाटन संपन्न झाले असून, महापौर संगीता खांडेकर यांनी रिबीन कापून या उपक्रमाचा शुभारंभ केला. या माध्यमातून पुंडलिक सोनकुसरे यांना नववर्षात नवी उभारी मिळाली. या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.