Sudhir Mungantiwar : बल्लारपूर जनतेने दिलेले प्रेम मी सेवेतून फेडणार..!

Sudhir Mungantiwar’s appeal to the people is that this voice should be heard in the EVM machine : नगराध्यक्षपदी रेणुका दुधे यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन

Ballarpur – Chandrapur : बल्लारपूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेणुका दुधे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आक्रमक आणि भावनिक भाषणातून वातावरण तापवले. सुरुवातीलाच जनतेला आवाहन करत त्यांनी “ये आवाज ईव्हीएम मशीन मे घुमनी चाहीये”, असा नारा दिला आणि मैदानावर टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.

जनतेशी असलेल्या संबंधांबाबत मुनगंटीवारांनी कृतज्ञता व्यक्त केली. या शहराने मला एक-दोन वेळा नाही, तर तब्बल सात वेळा निवडून दिले आहे. माझ्या आणि तुमच्या प्रेमाच्या नात्यामुळेच हा चमत्कार घडू शकला. बल्लारपूर जनतेनी भरभरून दिलेले प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मी या शहरावर मनापासून प्रेम करतो, असे सांगत त्यांनी भावनिक सूर लावला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेणुका दुधे यांची ओळख ‘कामगार पत्नी’ म्हणून देत त्यांनी सांगितले की, सामान्य जनतेच्या समस्या नगरपरिषद सोडवते. त्यामुळे रेणुका दुधे यांनी लोकांची मनं जिंकणारे काम करण्याचा संकल्प केला आहे. त्यांना संधी देणे म्हणजे बल्लारपूरच्या विकासाला गती देणे होय.

Election Commission : यशोमती ठाकूरांचा सरकार, आयोगावर थेट आरोप; म्हणाल्या ‘तो’ निर्णय मनमानी !

भाजपच्या निवडणूक रणनीतीचा उल्लेख करत आमदार मुनगंटीवार म्हणाले की, या १७ प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टी नाही, तर भारतीय जनता परिवाराचे उमेदवार उभे आहेत. त्यांना निवडून देणे म्हणजे बल्लारपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे होय. सभेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बल्लारपूरचा राष्ट्रीय गौरव करण्याचा संकल्प मुनगंटीवार यांनी केला. “बी फॉर भारतमध्ये बी फॉर बल्लारपूरचा गौरव वाढला पाहिजे. केवळ मुंबईतच नाही, तर देशभरात बल्लारपूरची ओळख ठाम दिसली पाहिजे, असे ते म्हणाले.

याच अनुषंगाने त्यांनी राममंदिर आणि संसद भवनातील लाकडाचा मुद्दा मोठ्या अभिमानाने मांडला. राम मंदिराचा प्रत्येक दरवाजा हा बल्लारपूरातून पाठवलेल्या लाकडाचा बनला आहे. संसद भवनात जायचे असल्यास कोणत्याही पक्षाचा नेता असो, तो आपल्या बल्लारपूरच्या लाकडापासून तयार झालेल्या दरवाजातूनच जाणार आहे. इतकेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बल्लारपूरच्या लाकडापासून बनलेल्या खुर्चीवर बसणार आहेत, असे त्यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या उपस्थितीत सांगितले.

Sudhir Mungantiwar : मुल नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात मुनगंटीवारांनी गाजवली सभा !

सभेचा समारोप करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, बल्लारपूरच्या विकासासाठी निधीची वर्षा करायची असेल, तर नगरपरिषदेत भाजपची सत्ता आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या पाठबळाचा उल्लेख करत त्यांनी रेणुका दुधे यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.मुनगंटीवारांच्या या भाषणाने निवडणूक वातावरणाला नवे तापमान मिळाले असून ‘बल्लारपूरचा गौरव’ हा मुद्दा आता प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे.