Today marks beginning of new era in justice process of Ballarpur; Adv. Inayat Syed : आजचा क्षण बल्लारपूरच्या न्यायप्रक्रियेच्या नव्या पर्वाचा आरंभ; ॲड. ईनायत सय्यद
Ballarpur : आपण ज्या भूमीवर उभे आहोत, ती केवळ जमीन नाही… ही बल्लारपूर न्यायालयाची पवित्र भूमी आहे. शेकडो नागरिकांच्या न्यायाच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्नांची ही वंदनीय भूमी आहे. माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ३६ कोटी ७० लक्ष रुपयाच्या खर्चातून ही इमारत उभी राहणार असून इमारतीसाठी शासकीय जागा आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बल्लारपूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ईनायत सय्यद यांनी या कार्यक्रमात मुनगंटीवार यांचे जाहीर आभार मानले.
ॲड सय्यद यांनी सांगितले की राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे अनेवर्षांपासूनचे आधुनिक आणि प्रशस्त न्यायालयीन इमारतीचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. या इमारतीसाठी ३६ कोटी ७० लक्ष रुपयाच्या निधीला त्यांनी मंजुरी मिळवून दिली, यामुळे तालुक्याच्या न्यायव्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.
२००८ पासून बल्लारपूर नगरपरिषद इमारतीत भाड्याच्या जागेत न्यायालयाचे कामकाज सुरू होते. यापूर्वी फौजदारी प्रकरणांसाठी राजुरा आणि दिवाणी प्रकरणांसाठी चंद्रपूर येथे जावे लागत होते. या प्रवासातील अंतर, वेळेचा अपव्यय आणि नागरिकांची सततची गैरसोय पाहता बल्लारपूरसाठी स्वतंत्र न्यायालयाची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत होती.ही आवश्यकता ओळखून राज्याचे माजी वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री व बल्लारपूरचे लोकप्रिय आमदार आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अविरत आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून बल्लारपूरला स्वतंत्र न्यायालय केवळ मिळवून दिले नाही, तर न्यायालय संकुलासाठी योग्य जागाही उपलब्ध करून दिली.
या अत्याधुनिक न्यायालय इमारतीसाठी ₹३६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आणि आज या ठिकाणी उभी राहत असलेली इमारत त्यांच्या दृढनिश्चयाची, संघर्षाची आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देत आहे. आजचे हे भूमिपूजन केवळ एका इमारतीचे नाही…तर न्यायाच्या मंदिराची, न्यायव्यवस्थेवरील विश्वासाची आणि बल्लारपूरच्या नव्या युगाची पायाभरणी आहे.ही इमारत भविष्यात न्यायदानाच्या प्रक्रियेला वेग, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांना सहज न्याय मिळण्याचे साधन ठरेल, असा विश्वास आम्हाला आहे. बल्लारपूर तालुका बार असोसिएशनतर्फे आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या या मोलाच्या कार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.
आजचा क्षण हा केवळ सोहळा नसून बल्लारपूरच्या न्यायप्रक्रियेच्या नव्या पर्वाचा आरंभ आहे,”अशी भावना अध्यक्ष ॲड. ईनायत सय्यद यांनी बल्लारपूर न्यायालय इमारत भूमिपूजन सोहळ्यात व्यक्त केली.
Electricity tariff reduction : 12% वीजदर कपात करण्याच्या निर्देशाला आव्हान !
बल्लारपूर न्याय भवनाचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला. या सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अनिल किल्लोर, न्या. पानसरे, न्या. महेंद्रकर न्या. श्रीमती समृद्धी भीष्म इतर न्यायाधीश तसेच बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी या इमारत भूमिपूजन सोहळ्याला शुभेच्छा देताना न्यायदानाचे पवित्र काम आणखी चांगल्या पद्धतीने येथे यशस्वी होईल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, अतिशय चांगली बिल्डिंग इथे उभी राहणार आहे. या बिल्डिंगची चित्रफित पाहिली. त्यामध्ये आहे तशीच इमारत तयार व्हायला पाहिजे. मला वाटतं महाराष्ट्रात तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जेवढ्या इमारती आहेत त्याच्यातली ही न्यायालयाची सर्वात सुंदर इमारत उभी राहील. ही वास्तू महाराष्ट्रात इतिहास घडवेल. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे या संदर्भात मार्गदर्शन केले.








