व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar : चंद्रपुरात मुनगंटीवारांचा दमदार ‘पॉवर शो’! भाजपच्या स्थापना दिनी १६३०...

Sudhir Mungatiwar : चंद्रपुरात मुनगंटीवारांचा दमदार ‘पॉवर शो’! भाजपच्या स्थापना दिनी १६३० कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश

A powerful ‘show of strength’ by Sudhir Mungantiwar in Chandrapur, 1,630 Party worker formally join the party: अल्पसंख्यांकांसह सर्व समाजघटकांचा सहभाग; मुनगंटीवारांच्या नेतृत्वावर विश्वास

Chandrapur भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात चंद्रपुरात एक अभूतपूर्व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल १६३० कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली.

या सोहळ्यात तुकम, शास्त्रीनगर, एमईएल, बंगाली कॅम्प, विवेक नगर, इंडस्ट्रिअल इस्टेट, जटपुरा गेट, वडगाव, नगीनाबाग, एकोरी वॉर्ड, भानापेठ, बाबूपेठ, भिवापूर, डॉ. आंबेडकर नगर, पडोली, धानोरा पिपरी आणि मोरवा यांसह विविध भागांतील नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, अल्पसंख्यांक मोर्चा आणि ख्रिश्चन समुदायातील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने भाजपचे कमळ हाती घेतले. आ. मुनगंटीवार यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या खांद्यावर भाजपचा दुपट्टा घालून त्यांना पक्षकार्यात सामील करून घेतले.

Baramati bypoll : “महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा नाही”

आमदार मुनगंटीवार यांची दिला शब्द, केला पूर्ण ही कामाची पद्धत आणि सर्वसामान्यांशी असलेली थेट नाळ यामुळे जनतेचा त्यांच्यावर ठाम विश्वास निर्माण झाला आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाचा फोन उचलणारे, अडचणीच्या वेळी धावून जाणारे आणि विशेषतः आरोग्यसंकटात मदतीचा हात देणारे हक्काचे नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. याच जनसंपर्कामुळे आज चंद्रपूरच्या जनतेत सुधीर मुनगंटीवार म्हणजे बस नाम ही काफी है! अशी भावना प्रबळ झाली असून, त्यांच्या कामाची पोचपावती म्हणूनच हा मोठा जनसमुदाय भाजपशी जोडला गेला आहे.

आपल्या मंत्रिपदाच्या काळात मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा ओघ सतत सुरू ठेवला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि पुढाकारातून साकारलेले सैनिक स्कूल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वन अकादमी, रामसेतू आणि अभियांत्रिकी महाविद्यालय यांसारखे प्रकल्प आज शहराच्या प्रगतीचे जिवंत प्रतीक ठरत आहेत. या भरीव विकासकामांमुळेच चंद्रपूरचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलला असून विकासाच्या या गतीला साथ देण्यासाठीच नागरिक मोठ्या प्रमाणावर भाजपाकडे आकर्षित होत असल्याचे या सोहळ्यावरून स्पष्ट झाले.

Monsoon 2026: २०२६ चा मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता

मर्यादांच्या चौकटीत अडकून न राहता मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती प्रत्यक्षात साकार करण्याचा आत्मविश्वास आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांमध्ये निर्माण केला आहे. केवळ विचारांच्या पलीकडे जाऊन कृतीतून बदल घडवण्याची प्रेरणा ते सातत्याने देत असतात. आमदार म्हणून जिल्ह्यासाठी विकासनिधी कसा खेचून आणायचा आणि तो योग्य ठिकाणी कसा खर्च करायचा, याचे अचूक भान त्यांना आहे. विधानसभेत त्यांनी मांडलेले अभ्यासपूर्ण मुद्दे आणि त्यामागील प्रामाणिक तळमळ यामुळेच अनेक कठीण प्रकल्प आज चंद्रपुरात यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. आज चंद्रपूर केवळ एक जिल्हा म्हणून मर्यादित राहिलेला नसून, राज्याच्या विकासाच्या नकाशावर झपाट्याने पुढे सरकणारा एक ‘ध्रुवतारा’ ठरत आहे, जे आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण तपश्चर्येचेच फळ आहे.

error: Content is protected !!