Sudhir mungatiwar : मुनगंटीवारांनी दिला शब्द केला पूर्ण; बल्लारपूर गुरुद्वारात ज्येष्ठांसाठी लिफ्ट लोकार्पण

Sudhir Mungantiwar fulfills his promise; elevator inaugurated for senior citizens at Ballarpur Gurudwara : झुलेलाल जयंतीला श्रद्धा-सेवेचा सुंदर संगम; सुधीर मुनगंटीवार यांचा उपक्रम

Chandrapur : समाजकार्यात दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवण्याची बांधिलकी काय असते, याचे प्रत्यंतर बल्लारपूरमध्ये पाहायला मिळाले. कॉलरी रोडवरील पूज्य सिंधी पंचायत गुरुद्वारात नव्याने उभारण्यात आलेल्या लिफ्टचे लोकार्पण भगवान झुलेलाल जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले. या उपक्रमामागे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार आहे.

गुरुद्वारात दररोज मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविक दर्शनासाठी येतात. मात्र उंच मजल्यांवर जाण्यासाठी जिना चढताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काहींना तर शारीरिक मर्यादांमुळे पूर्ण दर्शनही घेता येत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन गुरुद्वारा समितीने लिफ्टची मागणी केली होती.

Farmers suicide : शेतकरी आत्महत्यांचा थरारक आकडा; दशकात १,२५२ मृत्यू, प्रश्न अद्याप जिवंत!

ही मागणी मान्य करत मुनगंटीवार यांनी पुढील झुलेलाल जयंतीपर्यंत लिफ्ट उभारण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार अवघ्या वर्षभरात ही सुविधा उभारण्यात आली असून, दिलेला शब्द पूर्ण केल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.लोकार्पणावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त करत, “आता आम्हालाही सहज दर्शन घेता येईल,” अशी भावना व्यक्त केली. श्रद्धा आणि सेवाभावाचा संगम असलेली ही लिफ्ट ज्येष्ठांच्या सोयीसह त्यांच्या सन्मानाची जपणूक करणारी ठरली आहे.

Gopikishan bajoria : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नाही

या प्रसंगी गुरुद्वारा सेवा समितीच्या वतीने मुनगंटीवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच खरी जबाबदारी असल्याचे सांगितले. दरम्यान, श्रद्धा, सेवा आणि संवेदनशीलतेचा मिलाफ असलेला हा उपक्रम बल्लारपूरसाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘दिला शब्द केला पूर्ण’ या मुनगंटीवार यांच्या भूमिकेची पुनःप्रचिती देणारा ठरला आहे.