व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar : यह साधारण केवल नाम नहीं… सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील...

Sudhir Mungatiwar : यह साधारण केवल नाम नहीं… सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाला कार्यकर्त्याची अनोखी दाद

The Power of Mungantiwar’s Work! A Party Worker Composes a Poem Celebrating His Development Initiatives : वृक्षलागवड, आरोग्यसेवा आणि जनहिताच्या कार्याचा अनोख्या शब्दांत गौरव

Chandrapur : लोकप्रतिनिधीच्या कार्याची पावती जेव्हा जनतेच्या भावनेतून आणि कृतज्ञतेतून मिळते, तेव्हा त्या कार्याचे मोल अधिक वाढते. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेणारे आणि जनहितासाठी सदैव तत्पर असणारे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासदृष्टीला आणि संवेदनशील नेतृत्वाला अशीच एक हृदयस्पर्शी दाद देण्यात आली आहे. बल्लारपूर येथे आयोजित मन की बात कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपा युवा मोर्चा, बल्लारपूर शहरचे महामंत्री अरविंद चुनबाद वर्मा यांनी आ. मुनगंटीवार यांना एक विशेष काव्यरूप फ्रेम भेट देऊन त्यांच्या कार्याला काव्यमय मानवंदना दिली आहे.

अरविंद वर्मा यांनी तयार केलेल्या या काव्यरुप चौकटीत आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वगुणांचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे. “यह साधारण केवल नाम नही, किसी कुर्सी के मोहताज नहीं…” अशा शब्दांतून एका कार्यकर्त्याच्या मनातील आदर आणि कृतज्ञतेचा भाव या माध्यमातून व्यक्त झाला.आ. सुधीर मुनगंटीवार यांचे सार्वजनिक जीवन हे भौतिक विकासासोबतच पर्यावरणाची जपणूक आणि सामाजिक संवेदनांचे प्रतीक मानले जाते. अर्थमंत्री असताना त्यांनी ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प सिद्धीस नेऊन पर्यावरण संवर्धनाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले. या उपक्रमाची नोंद थेट ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली.

Manoj Jarange : शिंदेंचा मेळावा उधळू, काही गडबड झाल्यास जबाबदार राहणार नाही जरांगेंचा थेट फोन !

त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करून आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. शिक्षण, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत पुढाकार घेतला आहे.

केवळ भौतिक प्रगती म्हणजे विकास नव्हे, तर माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे ही आ. सुधीर मुनगंटीवार यांची विकासाची व्याख्या आहे. या काव्यात्मक भेटीच्या माध्यमातून त्यांच्या याच दूरदृष्टीचा आणि संवेदनशील नेतृत्वाचा गौरव करण्यात आला असून, ही भेट बल्लारपुरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे.

error: Content is protected !!